Modi Government : बुधवारी मोदी मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; राष्ट्रपती भवनात तयारी सुरु

145

लोकसभा निवडणूक-2024 साठी सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चाही जोर धरू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जुलै रोजी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. ज्यासाठी राष्ट्रपती भवनात मोठ्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असून मित्रपक्षातून पाच मंत्री केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या बैठकींच्या अनेक फेऱ्यांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या शक्यतेच्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. ज्यामध्ये गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

(हेही वाचा Maharashtra Government : ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांची ‘पत्रकार कल्याण निधी’ समितीवर निवड)

पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांचीही भेट घेतली होती. यापूर्वी अमित शहा, जेपी नड्डा आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांच्यात अनेक बैठका झाल्या. याशिवाय निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठका घेतल्या. भाजपने 4 जुलै रोजी तेलंगणा, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले होते. यामध्ये तेलंगणातील केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. या नियुक्तीनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतांना जोर आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.