शिवसेनेलाही हनुमान भावला! सभेच्या आधी बाईक रॅलीत हनुमान

100

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरावा अन्यथा त्यासमोर हनुमान चालीसा वाजवा, असे आवाहन केले होते, तेव्हापासून राज्यात हनुमान चालीसा म्हणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राणा दाम्पत्याला तर हनुमान चालीसा म्हटली म्हणून अटक करण्यात आली होती. आता शिवसेना येनकेन प्रकारेण आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे सिद्ध करण्यासाठीही हनुमानाचीच मदत घ्यावी लागली.

शिवसेनेची स्वतःचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी खटपट

राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावती येथून थेट मुंबईत दाखल झाले. मात्र त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि पुढे १४ दिवस तुरुंगात ठेवले. मात्र त्यानंतर भाजपसह राणा दाम्पत्य यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुविरोधी आहेत, असा आरोप करण्यात येऊ लागला. तसेच शिवसेनेला हनुमानाचे वावडे आहे, शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असेही म्हटले जाऊ लागले. खासदार नवनीत राणा यांनी तर बीकेसी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी आधी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असे आव्हान केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेला स्वतःचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी हनुमान भावला आहे. त्यामुळे शिवसेना भवनापासून बीकेसीपर्यंत बाईक रॅलीमध्ये हनुमानाचा रथ ठेवण्यात आला होता. त्यात हनुमानाच्या रूपात शिवसैनिक दिसत होते. त्यामुळे या रॅलीमध्ये शिवसेना येनकेन प्रकारेण आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे संकेत मिळत होते.

(हेही वाचा सरकारी नोकरीची मोठी संधी! २०६५ रिक्त पदांसाठी भरती  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.