मुंबईत महिनाभरात मध्य रेल्वे दलाल विरोधी पथकाकडून १ लाख ६२ हजारांची तिकिटे जप्त

98

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मध्य रेल्वेने तिकिटांच्या काळाबाजारावर मोठी कारवाई सुरू केली आहे. बोनाफाईड प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये, दलाल विरोधी पथक (ATS), मुंबई विभाग, आरपीएफच्या मदतीने वाणिज्य शाखेने अनधिकृत तिकीट विक्रेत्यांवर विशेष ऑपरेशन आणि सखोल तपासणी मोहीम राबवली.

दि. १ एप्रिल २०२२ ते १० मे २०२२ या कालावधीत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन दरम्यान, १,६२,३१३/- किमतीची ८९ तिकिटे जप्त करून पाच प्रकरणे नोंदवण्यात आली. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये, दलाल विरोधी पथकाने दलालांविरुद्ध २७ गुन्हे नोंदवले, ६४६ तिकिटे आणि रु. ७,९९,७५९/- जप्त केली.

दलाल पोलिसांच्या ताब्यात

दि. १३.५.२०२२ रोजी, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विभागातील तिकीट तपासणीच्या दलाल विरोधी पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे एसआयपीएफ, सीआयबी, कल्याणच्या आयटी सेलच्या सदस्यांनी एव्हियन हॉटेल, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विलेपार्ले पूर्व येथे सापळा रचून घनश्याम प्रजापती नावाच्या व्यक्तीला अटक केली. परिचय देताना, त्या व्यक्तीने स्वेच्छेने रु. ३७,९९५/- मूल्याचे रेल्वे आरक्षण तिकीट दिले आणि अधिक चौकशीत त्याने उघड केले की तो कमिशन तत्त्वावर काम करत आहे आणि त्याला पोईसर, कांदिवली पूर्व येथील रहिवासी रमेश यादव नावाच्या व्यक्तीने कामावर ठेवले होते. त्यानंतर घनशाम प्रजापतीला पोलीस कारवाईसाठी विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आणि रमेश यादवला पकडण्यासाठी एटीएसचे पथक कांदिवलीकडे रवाना झाले. रमेश यादव यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांनी चौकशी केली असता, घनश्याम प्रजापती यांना कमिशनच्या आधारे तिकिटे देण्यासाठी नेमल्याचे मान्य केले. त्यानंतर यादवला समता नगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले, पोलीस कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर घनश्याम प्रजापती आणि रमेश यादव या दोघांना रेल्वे सुरक्षा दल, घाटकोपर यांच्या ताब्यात देण्यात आले आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

तत्पूर्वी, दि. ११.५.२०२२ रोजी, कल्याण स्थानकावर 12138 अप पंजाब मेलमध्ये एक व्यक्ती रेल्वे प्रवास तथा आरक्षण तिकीट घेण्यासाठी येणार असल्याच्या टीपच्या आधारावर, त्या व्यक्तीला पकडण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली होती. एटीएस टीमने एसआयपीएफची मदत घेतली, IT सेलचे गोपाल राय यांनी योजनेची माहिती दिली. संशयित व्यक्तीवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. कल्याण स्थानकावर पंजाब मेल आल्यावर ही व्यक्ती बी-५ कोचमध्ये चढली आणि काही मिनिटांनी ट्रेनमधून उतरली. तत्काळ एटीएसच्या पथकाने एसआयपीएफ, आरपीएफच्या मदतीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, संतोष श्यामलाल गुप्ता नावाच्या व्यक्तीकडे रुपये १५ हजार ५४० किमतीची ३ रेल्वे आरक्षण तिकिटे आढळून आली आणि आवश्यक कारवाईसाठी गुप्ताला आरपीएफ, कल्याण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पुढे त्याचे निवासस्थानी तपास केला असता, एक मोबाईल, एक सीपीयू आणि ४३ ई-तिकीटांसह रु. १,०५,८९३ जप्त करण्यात आली. संतोष गुप्ताकडून जप्त केलेल्या तिकिटांची एकूण किंमत रु. १,२१,४३३/- आहे. त्याचे सॉफ्टवेअर खरेदी आणि आर्थिक व्यवहार इत्यादींबाबत पुढील तपास सुरू आहे.

( हेही वाचा: अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात )

दलाल विरोधा पथकाची बारीक नजर

तिकिटांच्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई विभागाच्या दलाल विरोधी पथकाने रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने कोणत्याही दलाली कारवायांवर बारीक नजर ठेवली आहे. नुकताच दाखल झालेला गुन्हा हा रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या दलाल विरोधी पथकासह आरपीएफ पथकाने केलेला आणखी एक समर्पित प्रयत्न आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.