Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पटेलांचा गौप्यस्फोट, मंत्री छगन भुजबळ यांचा दुजोरा

125
Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पहिल्या टप्प्यातील २०२४ च्या लोकसभा (Lok Sabha election 2024) निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. अजित पवार (DCM Ajit Pawar) हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात येण्यासाठी उत्सुक असताना शरद पवारांनी सुरुवातीला त्यांना पाठिंबा दिला होता ते त्यासाठी ५० टक्के अनुकूल देखील झाले होते, पण पवारांनी आयत्या वेळी कच खाऊन माघार घेतली, असा गौप्यस्फोट शरद पवारांचे निकटवर्ती नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्याला दुजोरा आहे. पण त्यापुढे जाऊन त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला, तो म्हणजे पवारांनी फक्त २०१९ किंवा २०२३ मध्येच कच खाल्ली असे नाही, तर २०१४ मध्ये देखील त्यांनी धडसोड वृत्तीच दाखवली होती. असे विधान छगन भुजबळ यांनी केले.

(हेही वाचा – Teacher : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार)

२०१४ च्या निवडणुकीतही पवारांनी तसा प्रयत्न

(NCP Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास ५० % अनुकूल होते, पण त्यांनी आयत्या वेळेस कच खाल्ली, असे प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनी पटेलांच्या वक्तव्याचे समर्थन केले, तर शरद पवार गटातील नेत्यांनी हा दावा चुकीचा असल्याचा दावा केला.छगन भुजबळ यांनी पटेलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, मी पटेलांची मुलाखत ऐकली नाही. पण, शरद पवारांनी आधीसुद्धा भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ च्या निवडणुकीतही पवारांनी तसा प्रयत्न केला होता. तुम्हा सर्वांना आठवत असेल, २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – भाजप मध्ये बिनसले होते.

(हेही वाचा – मिठी नदीच्या कामाच्या SIT चौकशीचे स्वागत; महापालिका आणि एमएमआरडीए दोन्हीही अडचणीत)

मंत्री छगन भुजबळ यांचे भाष्य 

भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार निवडून आले होते, तेव्हा आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेसने) भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळे चालले आहे. शरद पवारांनी तेव्हा सुद्धा धरसोड वृत्तीच दाखवली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्या दाव्यावर काहीही बोलणार नाही. आधीदेखील या विषयासंदर्भात बोललो आहे. पण हे सत्य आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावर भाष्य करताना मोठे विधान केले आहे.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.