Teacher : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

171

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिक्षिकेकडून (Teacher) विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या नूमवि शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पालकवर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : खिस्ती समुदायाला खुश करण्यासाठी शरद पवार-सुप्रिया सुळे चर्चमध्ये; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)

जयेश शिवाजी लोंढे असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याला शालेय शिक्षिकेने (Teacher) रागाच्या भरात बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गंभीर घटनेनंतर जयेश लोंढे या मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजा केदार असे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे (Teacher) नाव आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.