IPL 2024 : आयपीएलमध्ये शतक, अर्धशतक महत्त्वाचं की, स्ट्राईक रेट?

IPL 2024 : आयपीएलमध्ये मोठं शतक झालेला संघ जिंकेलच असं नाही. पण, मोक्याच्या क्षणी ३०-४० धावाही निर्णायक ठरतात

94
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL 2024) ही टी-२० लीग आहे. टी-२० क्रिकेटचं वेगळेपण फक्त घणाघाती फलंदाजीतच नाहीए. तर फॉरमॅटच्या अनिश्चिततेतही आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) संघ सध्या या अनिश्चिततेचा सगळ्यात जास्त सामना करतोय. यातील ६ पैकी ५ वेळा संघ पराभवात्या बाजूलाच आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध विराट कोहलीने (Virat Kohli) शतक झळकावलं. पण, संघाच्या १८४ धावा झाल्या. त्या शेवटी पुरेशा ठरल्या नाहीत. तेव्हा संघाला २० धावा कमी पडल्या म्हणावं, तर गुरुवारी मुंबई विरुद्ध संघाने १९६ धावा केल्या. पण, त्या ही अपुऱ्या ठरल्या. फाफ दू प्लेसिसचं अर्धशतक निष्फळ ठरलं. (IPL 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : खिस्ती समुदायाला खुश करण्यासाठी शरद पवार-सुप्रिया सुळे चर्चमध्ये; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)

या सगळ्यामुळे टी-२० मधील आणखी एक प्रश्न गडद झाला आहे. इथे शतक, अर्धशतक (फलंदाजीची सरासरी) महत्त्वाची की, स्ट्राईक रेट? या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ ठरलाय राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals). गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धचा एका धावेनं झालेला पराभव सोडला तर त्यांनी सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. (IPL 2024)

त्यांच्याकडे असलेले संजू सॅमसन, जोस बटलर, रियान पराग यांनी दीडशेच्या वर स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. या तिघांच्या नावावर किमान दोन अर्धशतकं आहेत. त्यामुळे हे उदाहरणही जाऊदे. पण, आतापर्यंत विजयी झालेल्या संघांमध्ये राहुल टेवाटिया (११ चेंडूंत २२), शाहरुख खान (८ चेंडूंत १४), राशिद खान (११ चेंडूंत २४) यांच्या छोटेखानी खेळी संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरल्या आहेत. या तिघांचाही स्ट्राईकरेट चक्क दोनशेच्या वर आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Raj Thackeray : आधुनिक राजकारणाचे कर्ण; मनसेने राजकीय भूमिका बदलल्यावर काय म्हणाले प्रकाश महाजन?)

मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेला सामना आठवा. गेल्या आठवड्यातील या सामन्यात मुंबईने २३४ धावांची मजल मारली होती. पण, या धावसंख्येत एकही अर्धशतक नव्हतं. इतकंच नाही तर एकही फलंदाज डावात ३३ च्या वर चेंडू खेळला नाही. पण, संघाने विजयही मिळवला आणि एकूण सामन्यांत दोनशेचा स्ट्राईक रेटही ठेवला. (IPL 2024)

या उलट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (Royal Challengers Bangalore) विराट कोहली आणि फाफ दू प्लेसिस हे दोघेही सलामीवीर फॉर्मात आहेत. विराटकडे तर ऑरेंज कॅपही आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी १२० पैकी १०५ चेंडू खेळून काढले. त्यातून चांगली पायाभरणी झाली. पण, संधाची धावसंख्या १८४ धावांवरच मर्यादित राहिली. कारण, ग्लेन मॅक्सवेल, लोमारोव, दिनेश कार्तिक आणि कॅमेरुन ग्रीन या तडाखेबंद फलंदाजांना संधीच मिळाली नाही. (IPL 2024)

(हेही वाचा- Vishal Patil : महाविकास आघाडीत फूट; सांगलीत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज)

त्यामुळेच आता प्रश्न निर्माण झाला आहे की, पारंपरिक क्रिकेटमध्ये जम बसलेल्या फलंदाजाचं जे महत्त्व आहे ते टी-२० मध्ये अप्रस्तुत आहे का? खासकरून इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे शेवटच्या क्षणी घणाघाती फलंदाजी करणारा खेळाडू संघात येऊ शकत असताना. कारण, संघाला अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची मुभा मिळते. त्यामुळे पहिली फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नेमक्या किती धावा पुरेशा आहेत हे ठरवणंच कठीण जातं. २०० धावा या आता सुरक्षित नाही तर स्पर्धात्मक झाल्यात. संघाला दोनशेच्या वर धावा करून देणारे फलंदाज त्यांनी हवेत. (IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.