पहाटेच्या शपथविधीची शरद पवारांना पूर्वकल्पना होती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट 

274

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्यस्फोट केला.

उद्धव ठाकरेंचा विश्वासघात अधिक जिव्हारी लागला 

या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत निवडणूक लढली, प्रचार केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जाहीर सभेत फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवायचे सांगायचे तेव्हा काही बोलले नाही. पण जेव्हा निकाल लागले आणि आकडे पाहिल्यावर जेव्हा उद्धव ठाकरे यांना दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करू शकतात तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद दिसले. आम्हाला उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात जिव्हारी लागला, कारण ते आपलेच होते, अजित पवार यांनी केलेला विश्वासघात तितका जिव्हारी लागला नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. 

(हेही वाचा कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या होणार सभा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.