कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या होणार सभा

148

सध्या कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराला रंगत आली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत. तरीही या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा होणार आहेत. त्यामुळे या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या सभा किती परिणामकारक ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार नाही, मात्र चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कसबा येथून हेमंत रासने हे निवडणूक लढवत आहेत. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचाही उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक चुरशीची होणार अशी शक्यता आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा किती परिणाम घडवून आणणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र चिंचवड येथे प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंवर टीकास्र डागले. बेडकाला वाटते मीच फुगलो आहे. पण, ते फुगलेपण काही खरे नसते, असा टोला अजित पवारांनी राहुल कलाटेंना लगावला आहे, असेही पवार म्हणाले.

(हेही वाचा सावरकरांच्या विचारातूनच भाजप हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवतो; सिद्धरामय्यांनी ओकली गरळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.