भारताचा ‘हा’ खेळाडू ठरला ICC प्लेअर ऑफ द मंथ!

143

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मागील काही सामन्यांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानिक केले आहे. तसेच अंडर १९ विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या ग्रेस हिला सुद्धा ICC कडून गौरवण्यात आले आहे.

( हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीची शरद पवारांना पूर्वकल्पना होती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट )

जानेवारी महिन्यासाठी शुभमनसोबत भारताचा मोहम्मद सिराज सुद्धा नामांकित होता. परंतु शुभमनने या पुरस्कारावर नाव कोरले आहे. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाची फिबी लिचफिल्ड आणि बेथ मूनी या दोघांना मात देत ग्रेस हिने पुरस्कार जिंकला आहे.

शुभमन गिल फॉर्ममध्ये…

शुभमन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वनडेसोबत टी २० फॉरमॅटमध्ये सुद्धा शतक झळकावले आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२६ धावा करणारा शुभमन गिल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यात त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये आतापर्यंत केवळ ७ फलंदाजांना शतक झळकावता आले आहे. यामध्ये शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासोबत आता सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि दीपक हुडा यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.