Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंनी साद घातली, तर सकारात्मक प्रतिसाद देऊ; शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ

172
Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंनी साद घातली, तर सकारात्मक प्रतिसाद देऊ; शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ
Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंनी साद घातली, तर सकारात्मक प्रतिसाद देऊ; शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे शिवसेनेच्या गोटातून नाराजीचा सूर उमटत असताना, मंत्री शंभूराज देसाई यांनी घरवापसीचा इशारा देऊ केला आहे. उद्धव ठाकरेंनी साद घातली, तर आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे देसाई म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंची साथ सोडताना एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीवर किंबहुना अजित पवारांकडे बोट दाखवत भाजपासोबत वेगळी चूल मांडली होती. तत्कालीन अर्थमंत्री असलेले अजित पवार निधी वाटपात भेदभाव करतात, शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत. शिवसेनेविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रसद पुरवून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत अनेक आमदार शिंदेंसोबत बाहेर पडले होते. आता शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये अर्थ मंत्रालयाची धुरा पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे जाण्याचे संकेत मिळत असल्यामुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

(हेही वाचा – MNS : मनसेची बॅनरबाजी… महाराष्ट्रात एकच पर्याय… राज ठाकरे!)

अजित पवारांना अर्थ मंत्रालय मिळू नये अशी शिवसेनेच्या बहुतांश आमदारांची भावना आहे. ती भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीआधी शंभूराज देसाई यांनी घरवापसीसंदर्भात विधान करून खळबळ उडवून दिली आहे. मात्र, देसाई यांचे हे विधान भाजपावर दबावतंत्रासाठी असल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले शंभुराज देसाई?

उद्धव ठाकरे गटाकडून काही प्रस्तावर आला, तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देणार का? असा सवाल विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, कुणी साद घातली, तर आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. अद्याप तरी आम्हाला तसा प्रस्तावर आला नाही. ही राजकारणातील नेहमीची पद्धत आहे. जर कुणी आपल्याला सकारात्मक साद घातली तर तो प्रस्ताव आपण लगेच नाकारत नाही. त्यावर विचार करू असे म्हणतो. पण विचार करणारा मी एकटा नाही. आमचे नेते आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.