Shailesh Pandey joins BJP: उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते शैलेश पांडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश करताच शैलेश पांडे यांची भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती. (Shailesh Pandey joins BJP)

34
Shailesh Pandey joins BJP
Shailesh Pandey joins BJP: उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते शैलेश पांडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते शैलेश पांडे, तसेच मीरा भाईंदरच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका स्नेहा पांडे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारा अक्रम यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. (Shailesh Pandey joins BJP)

शैलेश पांडेंकडे दिली ‘या’ पदाची जबाबदारी (Shailesh Pandey joins BJP) 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, माजी आमदार नरेंद्र मेहता, अमरजीत मिश्रा आदी उपस्थित होते. शैलेश पांडे यांची भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारताला आत्मनिर्भर, सर्वश्रेष्ठ देश बनविण्याची संकल्पना मांडली आहे. पंतप्रधानांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ‘घर चलो’ अभियानाद्वारे ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधण्याचा पक्षाचा संकल्प आहे. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (Shailesh Pandey joins BJP)

(हेही वाचा – Shivsena On Ajit Pawar: लवकरच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार: शिवसेना नेत्याचा दावा)

यावेळी उद्धव ठाकरे गटाचे सुरेश दुबे, विनोद तिवारी, संदीप शर्मा, संजय गुप्ता, विनायक पांडे, भोलानाथ गुप्ता, विनोद मिश्रा, अभिषेक दुबे आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. (Shailesh Pandey joins BJP)

(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीच्या सुट्टीवर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.