Sanjay raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का बसणार नाही; राऊतांचं भाकित

137
Sanjay Raut: 'पूर्ण बरे होऊनच परत यावे...' 'या' नेत्याने भरला संजय राऊतांचा येरवडा मनोरुग्णालयाचा फॉर्म
Sanjay Raut: 'पूर्ण बरे होऊनच परत यावे...' 'या' नेत्याने भरला संजय राऊतांचा येरवडा मनोरुग्णालयाचा फॉर्म

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे शुक्रवार, (५ एप्रिल) सांगली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेसकडून (Congress)नाराजी व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीचा उमेदवार बदला, अशीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अशातच आता संजय राऊत (Sanjay raut) यांनी सांगली आमचीच असे स्पष्ट केले आहे. राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. (Sanjay raut)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदारांची काय आहे ‘मन की बात’? केंद्राच्या कामावर नाखुश; पण…)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का बसणार नाही

संजय राऊत (Sanjay raut) म्हणाले, ”निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भात सुरू झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. त्यामुळे आपण वेळ न घालवता मतदारांमध्ये जायला हवं. महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरश: झंझावात असावा त्यापद्धतीचं मला दिसतं आहे तसेच आता बदल करायचाच अशा मानसिकतेमध्ये लोकं आहेत. महाराष्ट्रात कोणीही कितीही डरकाळ्या फोडल्या तरी महाविकास आघाडीला धक्का बसणार नाही. विदर्भ दौऱ्यावर आदित्य ठाकरे जाणार आहेत. याशिवाय पुढील दिवस मी त्या भागात आहे. त्यानंतर मी हातकणंगलेला जाईल. तिथे शिवसैनिक, काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी बैठका घेऊन, त्यांना कामाला लावून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. यासाठी मी त्या भागात जात आहे.” असे राऊतांनी स्पष्ट केले. (Sanjay raut)

(हेही वाचा – Mumbai Crime : बोगस जामीनदारांची टोळी उदध्वस्त, शेकडो आरोपींना बोगस जामीन देऊन काढले तुरुंगातून बाहेर)

छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ

”रामटेक हा परंपरेने आमचा मतदारसंघ आहे. आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की, तो मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा. त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ आता काँग्रेसकडे (Congress)आहे. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथेही आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की, तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली. आपण जेव्हा आघाडीत काम करतो, तेव्हा कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन त्यांची समजूत काढायची असते.” असं राऊत म्हणाले. (Sanjay raut)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.