Mumbai Crime : बोगस जामीनदारांची टोळी उदध्वस्त, शेकडो आरोपींना बोगस जामीन देऊन काढले तुरुंगातून बाहेर

155
Mumbai Crime : बोगस जामीनदारांची टोळी उदध्वस्त, शेकडो आरोपींना बोगस जामीन देऊन काढले तुरुंगातून बाहेर
Mumbai Crime : बोगस जामीनदारांची टोळी उदध्वस्त, शेकडो आरोपींना बोगस जामीन देऊन काढले तुरुंगातून बाहेर
मुंबई गुन्हे (Mumbai Crime) शाखेने एक अशा टोळीचा छडा लावला आहे,जी टोळी बोगस जामीनदार (Bogus jamin) न्यायालयात उभे न्यायालयाची फसवणूक करीत होती. या टोळीने मागील एक वर्षात शेकडो आरोपीना बोगस जामीनदारांच्या मदतीने तुरुंगातून बाहेर काढण्यास मदत केली आहे. बोगस जामीन (Bogus jamin) देण्यासाठी ही टोळी आरोपीच्या नातलगाकडून १० हजार ते १लाख उकळत होती. मुंबई गुन्हे (Mumbai Crime) शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने मानखुर्द येथून या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करून मोठ्या प्रमाणात या टोळीकडून बोगस सरकारी कागदपत्रे आणि संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Mumbai Crime)
अमित नारायण गिजे ( ४४),बंडु वामन कोरडे (४४),अहमद कासिम शेख (४४),संजीव सोहनलाल गुप्ता (३४) उमेश अर्जुन कावले (४८) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांचे नावे आहेत.या टोळीतील बंडू आणि संजीव गुप्ता यांच्याविरुद्ध यापूर्वी ४ ते ५ गुन्हे दाखल असून त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर या टोळीने वर्षभरापूर्वी मानखुर्द महात्मा फुले नगर येथे घर भाडयाने घेऊन त्या ठिकाणी न्यायालयात जामिनासाठी लागणारे बोगस (Bogus jamin) कागदपत्रे तयार करून मजुरी काम करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयात जामीनदार म्हणून उभे करीत होते.  गुन्ह्याची गंभीरता तसेच आरोपीची आर्थिक परिस्थिती बघून जामिनासाठी ही टोळी १० हजार पासून १ लाख रुपये एवढी रक्कम घेत होते. (Mumbai Crime)
जामीनदार म्हणून उभे राहणाऱ्या मजुराला एका जामिनासाठी २ ते ३ हजार रुपये मोबदला देण्यात येत होता अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली.या टोळीकडून आठवड्यातून तीन ते चार जणांना बोगस कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे काम करीत होती. मागील वर्षभरात या टोळीने विविध गुन्ह्यात अटक असलेल्या शेकडो आरोपीना बोगस कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून दिले असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. मुंबई गुन्हे (Mumbai Crime) शाखा कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे (Ravindra Salunkhe) यांच्या पथकाने या टोळीच्या मानखुर्द येथील घरावर छापा टाकून५ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, वेगवेगळया कंपन्यांचे ओळखपत्रे, पॅनकार्ड, महानगर पालिकेच्या कर पावत्या, एक लॅपटॉप, एक मल्टीपल प्रिंटर, एक मिनी लॅमिनेटर, एकाच इसमाचे वेगवेगळया नावांनी तयार केलेली आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँक स्टेमेंट, सॉलव्हनसी, विविध कंपन्यांची ओळखपत्रे इत्यादी बनावट कागदपत्रे हस्तगत करण्यात आलेली आहेत. या टोळीच्या बोगस जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपीची माहिती मिळविण्यात येत असून ही माहिती संबंधित न्यायालयाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली, तसेच टोळीच्या संपर्कात वकील आहेत का याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.