Crime News: मालवणीत मिळत होते २ हजारात बोगस आधार, वोटर कार्ड; एकाला अटक

159
Crime News: मालवणीत मिळत होते २ हजारात बोगस आधार, वोटर कार्ड; एकाला अटक
Crime News: मालवणीत मिळत होते २ हजारात बोगस आधार, वोटर कार्ड; एकाला अटक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मालवणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. (Crime News) अवघ्या २ हजार रुपयांमध्ये बोगस आधारकार्ड, Aadhar Card वोटर आयडी  पॅन कार्ड तयार करून देणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे. या टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी अटक करून मोठ्या प्रमाणात बोगस सरकारी कागदपत्रे आणि संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर हे साहित्य जप्त केली आहे. ही टोळी बांग्लादेशी नागरिकांना बोगस  आधारकार्ड, (Aadhar Card) पॅनकार्ड (Pancard)आणि वोटर आयडी बनवून देत असल्याचा संशय पोलिसांना असून या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News)

(हेही वाचा – मुंबईतील Coastal Road बोगद्यात पहिला अपघात; उद्घाटनानंतर काही दिवसांतच घडली घटना)

मोहसीन मोहम्मद रफिक शेख (Mohsin Mohammad Rafiq Shaikh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मालाड मालवणी आरएससी गेट क्रमांक ८ येथे राहणारा मोहसीन हा एमएचबी कॉलनी, गायकवाड नगर, गेट क्रमांक ८ येथे आधारकार्ड सेंटर, तसेच इतर प्रमाणपत्रे सेंटर चालवत असून तो २हजार रुपयांमध्ये सरकारी बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याची माहिती  मालवणी पोलीस ठाण्याचे सपोनि. निलेश साळुंखे यांना मिळाली होती.या माहतीच्या निलेश साळुंखे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढावा यांच्या मार्गदर्शनाखाली या आधार केंद्रावर छापा टाकला असता त्या ठिकाणी काही महिला पुरुष  आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मध्ये फेरफार करण्यासाठी उभे होते. (Crime News) पोलिस पथकाने चौकशी केली असता मोहसीन हा आधारकार्ड, (Aadhar Card) पॅन कार्ड (Pancard) बनवून देतो अशी माहिती समोर आली. पोलिसांनी मोहसीन ला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संगणक आणि इतर कागदपत्रे तपासली असता मोहसीन हा आधारकार्ड पोर्टलच्या माध्यमातून आधारकार्ड(Mohsin Mohammad Rafiq Shaikh) मध्ये चुकीचे फेरफार करीत असल्याचे समोर आले, तसेच  त्याच्या संगणकात वोटर आयडी तयार करण्याचे अप्लिकेशन होते त्यातून तो बनावट वोटर आयडी तयार करून देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Crime News)

(हेही वाचा – Lok Sabha 2024 : विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी)

पोलिसांनी त्याच्या आधार केंद्रातून संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट आधारकार्ड इत्यादी साहित्य जप्त करून मोहसीन (Mohsin Mohammad Rafiq Shaikh) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहसीन बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून देणारी टोळी चालवत होता, व त्याने अनेकांना बोगससरकारी  कागदपत्रे  तयार केली असावी तसेच बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Crime News)

(हेही वाचा – BMC : नालेसफाईच्या कामांमध्ये कुचराई झाल्यास यंदा मुंबईकर जाणार पुरात वाहून)

मोहसीन याच्या संगणकामध्ये असलेल्या आधारकार्ड, (Aadhar Card) वोटर आयडी, पॅन कार्ड (Pancard) बनवून देण्याचे पोर्टलच्या माध्यमातून मोहसीन (Mohsin Mohammad Rafiq Shaikh) हा २हजार रुपये घेवून आधारकार्ड मध्ये खोट्या फेरफार, बोगस वोटर आयडी, बोगस पॅनकार्ड तयार हुबेहूब बनवून देत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे सपोनि.निलेश साळुंखे यांनी दिली. (Crime News)

(हेही वाचा – Uttar Pradesh ATS : नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक)

पोलिसांनी मोहसीन ला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संगणक आणि इतर कागदपत्रे तपासली असता मोहसीन हा आधारकार्ड पोर्टलच्या माध्यमातून आधारकार्ड मध्ये चुकीचे फेरफार करीत असल्याचे समोर आले, तसेच  त्याच्या संगणकात वोटर आयडी तयार करण्याचे अप्लिकेशन होते त्यातून तो बनावट वोटर आयडी बनवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी त्याच्या आधार केंद्रातून संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट आधारकार्ड इत्यादी साहित्य जप्त करून मोहसीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.