Lok Sabha Elections 2024 : ज्योती मेटे निवडणूक लढविण्यावर ठाम, बीडमध्ये शुक्रवारी शक्तिप्रदर्शन; ‘वंचित’चा पाठिंबा मिळण्याची शक्यता

265
Lok Sabha Elections 2024 : ज्योती मेटे निवडणूक लढविण्यावर ठाम, बीडमध्ये शुक्रवारी शक्तिप्रदर्शन; 'वंचित'चा पाठिंबा मिळण्याची शक्यता
Lok Sabha Elections 2024 : ज्योती मेटे निवडणूक लढविण्यावर ठाम, बीडमध्ये शुक्रवारी शक्तिप्रदर्शन; 'वंचित'चा पाठिंबा मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) (NCP) उमेदवारी नाकारल्यानंतरही शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti mete) यांनी बीड लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या  शुक्रवारी बीडमध्ये जाणार असून त्यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तसेच मेटे यांच्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकर यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Elections 2024)
 राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गटाने (NCP) ज्योती मेटे (Jyoti mete) यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. त्यांच्याशी शरद पवार यांनी तीनवेळा चर्चा केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीने (Nationalist Congress) अजित पवार गटातील बजरंग सोनावणे यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याशी देखील उमेदवारी देण्याविषयी चर्चा केली. अखेरच्या टप्प्यात बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांची उमेदवारी अंतिम करीत ज्योती मेटे यांना राष्ट्रवादी सोबत येत राज्यभर प्रचारात सामील होण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना पुढे विधानपरिषदेवर पाठविण्याचा पर्याय देण्यात आला. मात्र, ज्योती मेटे (Jyoti mete) यांनी तो नाकारला. (Lok Sabha Elections 2024)
शुक्रवारी शरद पवार गटाने (NCP) बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योती मेटे (Jyoti mete) यांनी शिवसंग्रामकडून अपक्ष निवडणूक लढविण्याचा (Lok Sabha Elections 2024) निर्णय घेतला आहे. त्या शुक्रवारी बीड मध्ये जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीला वंचितचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.