Sanjay Raut : पाच राज्यांच्या निवडणुका नंतरच चर्चा – संजय राऊत

48
Sanjay Raut: महाविकास आघाडीचे ४८ जागांवर एकमत, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut: महाविकास आघाडीचे ४८ जागांवर एकमत, संजय राऊत यांचा दावा
लोकसभा शेअरिंगचा इंडि आघाडीची बैठक आणि चर्चा ही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतरच होईल. असे स्पष्टपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांमधील कोणत्या आणि किती जागा  कोणता पक्ष लढेल यासंदर्भातील सर्व चर्चा या पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकांच्या निकालानंतरच होऊ शकते असे आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा-Ministry of Coal : देशात 1404 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाची योजना – कोळसा मंत्रालय)

शरद पवार गटाचा लोकसभा जागांवर मोठा दावा…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या जवळपास १२ ते १५ जागा आम्हीच लढणार असा दावा केला होता. याबद्दल पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नाला बगल देत पुढील चर्चा ही पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने केलेल्या दाव्यानंतर इंडि आघाडीत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील शिवसेने द्वारा निवडून आलेल्या १९ जागांवरती आपला दावा ठोकला होता. त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.