मोदी-पुतिन यांची दिल्लीत भेट, AK-203 रायफल फॅक्टरी उभारण्यासह ‘या’ करारांवर होणार स्वाक्षरी!

66

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत आले आहेत. पुतीन यांच्या दौऱ्यात दोन्ही देश AK-203 असॉल्ट रायफल्सच्या निर्मितीसाठी 5,100 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे. त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यात पुतिन पंतप्रधान मोदींना प्रगत S-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सुपूर्द करतील, असे वृत्त एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

भारत-रशियाचा संयुक्त उपक्रम

या दौऱ्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये AK-203 असॉल्ट रायफलचा करार करणे समाविष्ट आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा येथील कारखान्यात रशियाच्या मदतीने या रायफल्स तयार केल्या जाणार आहेत. प्लांटमध्ये पाच लाखांहून अधिक रायफल तयार करण्यासाठी करार करण्यात येणार आहे. हा भारत आणि रशियाच्या प्रयत्नांतून सुरु करण्यात आलेला संयुक्त उपक्रम असणार आहे. हा करार झाल्यानंतर सात वर्षांत या कारखान्याचे पूर्ण हस्तांतरण करुन तो भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 4 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने AK-203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या कराराला मंजुरी दिली.

(हेही वाचा- …तर बूस्टर डोसची गरज आहे का?, अजित पवारांची स्पष्ट भूमिका)

सहा महिन्यांत पुतिन यांचा पहिलाच देश दौरा 

गेल्या सहा महिन्यांत पुतिन यांचा हा पहिलाच देश दौरा आहे. भारताकडून S-400 ची खरेदी 5 अब्ज किमतीच्या शस्त्रास्त्र कराराचा एक भाग आहे. अशा व्यवहारांवर अमेरिकेचे निर्बंध लादण्याचा धोका पत्करून भारत रशियाकडून अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे खरेदी करत आहे. मात्र चीनवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात भारताशी मैत्री वाढवणाऱ्या अमेरिका याकडे डोळेझाक करू शकते. S-400 प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची खरेदी हा ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या शस्त्रखरेदी व्यवहाराचा भाग आहे. अशाच खरेदीनंतर अमेरिकेने नाटो सहयोगी तुर्कीला आपली प्रगत F-35 लढाऊ विमाने देशाला विकण्यावर निर्बंध घातले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.