RSS मुख्यालयात मोहन भागवतांनी फडकवला तिरंगा! बघा Video

110

संपूर्ण देशात आज आझादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघटनेच्या नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकावला. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात संघाचे काही स्वयंसेवक आणि प्रचारक देखील उपस्थित होते.

(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मारक समिती येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी ५ वाजता स्वयंसेवक शहरातील विविध भागांत ‘पथसंचलन’ करणार असल्याचे सांगितले जात आहे. नागपूरच्या महाल परिसरात असलेल्या संघ मुख्यालयापासून दरोडकर चौक-गांधी पुतळा-गांधी बाग गार्डन-गोळीबार चौक-त्रिवेणी चौक-लाल इमली चौक-भारत माता चौक-तीन नळ चौक या मार्गाने हे पथसंचलन – नंगा पुतला चौक – भावसार.चौक – चितार ओली – बडकस चौक मार्गे संघ मुख्यालयात परत येईल.

बघा Video

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून संघटनेच्या नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून हा उपक्रम राबवला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्यांचे डिपी देखील राष्ट्रध्वजात बदलले दिसून आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.