मुस्लिम कार्यकर्त्यांकडून राज यांच्या भोंग्यांवरील भूमिकेचे समर्थन 

97

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्याचे आता मनसेतील मुस्लिम कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे. भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. आवाजाचा त्रास केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुस्लीमांनाही होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोंगे हटलेच पाहिजेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर पक्षातील अनेक मुस्लिम कार्यकर्ते या भूमिकेला समर्थन देत आहेत.

काय म्हणाले एहसामोद्दीन खान?

अंबरनाथ येथील मनसेचे मुस्लीम पदाधिकारी एहसामोद्दीन खान यांनी हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात जात दर्शन घेतले. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भोंगे हटवण्याच्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले आहे. एहसामोद्दीन खान म्हणाले की, अंबरनाथमध्ये कधीही जातीयवाद झाला नाही. शिवनगर परिसरात हनुमान मंदिरात मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मशिदीवरील भोंगे हटवावे असे म्हटले होते. त्यावेळी शाबीरभाई शेख यांनी शिवसेना सोडली नाही. शाबीरभाई हे अंबरनाथमधून ३ वेळा आमदार झाले. मंत्रिपद मिळाले. मीदेखील मनसे सोडणार नाही. राजसाहेब जे सांगतायेत ते न्यायालयाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजानला विरोध नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे जे काही बोलले ते कायद्याने पाळण्याचे सांगितले त्यात चुकीचे काही नाही. सरकारने कायद्याचे पालन केले तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. राज ठाकरेंना कधीच सोडणार नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असेही अंबरनाथ येथील मनसेचे एहसामोद्दीन खान यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा गणेश नाईक अडचणीत, नाईकांच्या वाड्यात चालला काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.