‘राज गर्जने’ची तयारी! पुण्यात पुरोहितांकडून धार्मिक विधी, मंत्रोच्चार व शंखनाद

105

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी पोलिसांनी परवानगी दिली असली तरी काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत. दरम्यान राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी त्यांच्या पुण्यातील घरी मंत्रोच्चार व शंखनाद केला जाणार आहे. १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी संपन्न होणार आहे.

( हेही वाचा : राज ठाकरे पुण्यातूनच होणार औरंगाबादकडे रवाना )

मनसेकडून जनतेला आवाहन

राज ठाकरेंना शुभाशिर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन पुण्यात लॉ कॉलेज येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहणार आहेत असे बॅनर लावत आपण ही या हे आवाहन मनसेकडून जनतेला करण्यात येत आहे. यावेळी पुरोहितांकडून दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे तसेच सभेला विजय आणि यश प्राप्त होण्यासाठी मंत्रोच्चार केला जाणार आहे. अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल होताच त्यांनी या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. सभा स्थळ, व्यवस्था, तयारी कशी करण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती अमित ठाकरे यांनी घेतली.

प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी सुरू

औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील या सभेच्या दिवसाकरता बंदोबस्ताचा प्लान तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबादेत १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्युत्तर सभा होणार आहे. प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात सगळीकडे मनसेचे झेंडे लावण्याची आणि कार्यक्रम पत्रिका वाटपाची मनसैनिकांनी तयारी सुरू केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.