‘संयुक्त महाराष्ट्र कलादालनाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष!’

143

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०९ मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होतील परंतु या कलादालनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेतूस्परपणे दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )

कलादालनावर विस्मरणाचा अंधार

महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलट पक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगासाठी केला जातोय. स्व.बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. सर्वच पातळ्यांवर कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठी आपण खबरदारी घेत आहात असेही त्यांनी सांगितले.

New Project 101

आपल्या हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावं

पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचित का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्र्च्या आस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचित समावेश करावा आणि आपल्या हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावं असे आव्हान नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.