Samyukta Maharashtra Smriti Dalan : संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन दुर्लक्षितच

मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

405
Samyukta Maharashtra Smriti Dalan : संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन दुर्लक्षितच

संयुक्त महाराष्ट्र लढा आणि हुतात्म्यांचे बलिदान चिरंतन रहावे तसेच भावी पिढीलाही याचा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील वास्तूमध्ये केली. परंतु तब्बल १४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले स्मृती दालन आजही दुर्लक्षित आहे. या वास्तूत ना पर्यटक येत ना विद्यार्थी वर्ग. त्यामुळे हे कलादालन का आणि कुणासाठी बांधले असा सवाल उपस्थित होत आहे. (Samyukta Maharashtra Smriti Dalan)

New Project 2024 04 30T214256.602

मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या तीन मजल्यांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संक्षिप्त इतिहास मांडण्यात आला आहे. सन २०१० ला हे स्मृती दालन सुरू झाल्यानंतर कोविड पासून पूर्ण पणे बंद होते. कोविड नंतर हे सुरू करण्यात आले असले तरी लोकांना मात्र याची अद्याप कल्पना देण्यात आली ना पर्यटकांना. (Samyukta Maharashtra Smriti Dalan)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम)

या स्मृती दालनाला भेट देण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत असेल तरी ही वास्तू आता खंडर बनत ही वास्तू आता वाहन पार्किंगची जागा म्हणून ओळखली जाते. या जागेत मोठ्या प्रमाणात बाहेरील आणि तरण तलावात पोहायला येणाऱ्या व्यक्तीच्या वाहनांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे याठिकाणी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन आहे ओळखही जनतेला तसेच पर्यटकांना होत नाही. (Samyukta Maharashtra Smriti Dalan)

New Project 2024 04 30T214410.280

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे स्मृती दालन उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. या स्मृती दालनाच्या कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार न नेमता तरण तलावाच्या कंत्राट कामातच वाढ दर्शवून ही स्मृती दालनाची वस्तू बांधण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यासाठी हा अट्टाहास केला होता त्या वास्तूचे पावित्र्य आणि भावी पिढीला या इतिहासाची ओळख करून देण्यात मुंबई महापालिका प्रशासन कमी पडताना दिसत आहे. (Samyukta Maharashtra Smriti Dalan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.