Naxalite : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची सुरक्षा जवानांसोबत चकमक ; ३ महिला नक्षलवाद्यांसह ८ माओवादी ठार

चकमकीनंतर घटनास्थळाच्या झडतीदरम्यान, ०२ महिला माओवाद्यांसह एकूण ०८ माओवाद्याचे मृतदेह सापडले आहेत, त्यांची ओळख पटवली जात आहे.

106
Naxalite : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची सुरक्षा जवानांसोबत चकमक ; ३ महिला नक्षलवाद्यांसह ८ माओवादी ठार

छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील नक्षल्यांचा (Naxal) गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये  मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी १० माओवाद्यांचा खात्मा (Naxal Attack) केल्याची माहिती मिळाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर परिसरात शोध घेत असताना १० माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चकमकीत घटनास्थळी ०३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. तर, चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आले आहेत. (Naxalite)

१० माओवाद्यांना यमसदनी धाडले  

फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलवादी कारवायांच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांच्या तुकडीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी अचानक हल्ला केला. यामुळे त्यांचा डाव उधळून लावण्यात जवानांना यश आले आहे. (Naxalite)

टेकमेटा आणि काकूर गावादरम्यान झाली चकमक

ही कारवाई डीआरजी आणि एसटीएफच्या तुकडीच्या संयुक्त दलाने केली आहे. तर टेकमेटा आणि काकूर गावादरम्यानच्या जंगलात पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरू असल्याचीही माहिती पुढे आली आहे. प्राथमिक माहितीनुसार छोटेबैठिया पोलीस स्टेशनच्या टेकामेटाच्या जंगल परिसरात ही चकमक सुरू होती.  (Naxalite)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.