IPL 2024 Swapnil Singh : आयपीएलच नाही, तर क्रिकेट सोडणार होता स्वप्निल सिंग, आता ठरलाय बंगळुरूसाठी हीरो

IPL 2024 Swapnil Singh : आयपीएल लिलावात स्वप्निल सिंगवर सुरुवातीच्या फेऱ्यात बोलीच लागली नव्हती.

163
IPL 2024 Swapnil Singh : आयपीएलच नाही, तर क्रिकेट सोडणार होता स्वप्निल सिंग, आता ठरलाय बंगळुरूसाठी हीरो
  • ऋजुता लुकतुके

२०२४ च्या आयपीएल हंगामापूर्वी खेळाडूंचा मिनी लिलाव झाला तेव्हा भारतात डावखुरा फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंग (Swapnil Singh) टीव्हीसमोर बसून होता. त्याचं नाव एकूण दोनदा पुकारलं गेलं. पहिल्यांदा जेव्हा नियमित लिलावात त्याचं नाव आलं तेव्हा. पण, कुणीही त्याच्यावर बोली लावली नाही. क्रिकेटमध्ये १८ वर्ष घाम गाळून झाला होता. त्यामुळे स्वप्निलला आता सगळंच संपलं असं वाटणं स्वाभाविक होतं. त्याक्षणी, ‘आता क्रिकेट सोडण्याची वेळ झाली,’ असाच निराशेचा विचार त्याच्या मनात डोकावला. (IPL 2024 Swapnil Singh)

पण, विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा बंगळुरू संघाने त्याच्यासाठी बोली लावली. स्वप्निलला (Swapnil Singh) तो प्रसंग अजूनही आठवतो. ‘मी एका सामन्यासाठी धरमशालाला चाललो होतो. संध्याकाळी साडेसातला तिथे पोहोचलो. लिलावाच्या शेवटच्या काही फेऱ्या बाकी होत्या. पण, आधीच्या अनुभवामुळे निराश वाटत होतं. आता खेळ सोडून द्यायचा या मतापर्यंतही पोहोचलो होतो. सध्या सुरू असलेला देशांतर्गत हंगाम खेळायचा आणि मन निवृत्ती स्वीकारायची असे विचार मनात घोळत होते. पण, शेवटच्या क्षणी सगळंच बदललं. नवीन उमेद जागृत झाली,’ असं स्वप्निलने आरसीबी बोल्ड डायरीज या कार्यक्रमात म्हटलं आहे. (IPL 2024 Swapnil Singh)

(हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar मध्ये एकमेव मुलीला १०० टक्के गुण!)

स्वप्निलचा स्ट्राईकरेट आहे इतक्या धावांचा 

२००६ मध्ये स्वप्निलने (Swapnil Singh) क्रिकेटला सुरुवात केली आणि तेव्हाच त्याने विराट कोहलीबरोबर ड्रेसिंग रुमही शेअर केली आहे. यंदा ३३ वर्षीय स्वप्निलला आरसीबीने २० लाख रुपयांत विकत घेतलं. आणि त्यांच्यासाठी त्याने पैसै वसूल कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात ८ सामन्यांत त्याने ६ बळी मिळवताना त्याने षटकामागे ८.८० धावा दिल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १६ धावांचा आहे आणि सर्वोत्तम कामगिरी आहे २८ धावांत २ बळी. बंगळुरूकडून सामना खेळायला मिळावा यासाठी स्वप्निलने प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्याकडे विनंती केली होती. (IPL 2024 Swapnil Singh)

‘मूळात आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. तेव्हाच माझे कुटुंबीयही भावूक झाले होते. जे करायची इच्छा होती, त्यासाठी मिळालेली ती शेवटची संधी होती. त्यामुळे ती गमावायची नव्हती. मी फ्लॉवर यांना भेटलो. शिबिरादरम्यान त्यांना पटवून दिलं की, मला का आयपीएल (IPL) खेळायचंय. रणजीतील कामगिरी त्यांना सांगितली. विशेष म्हणजे त्यांनी विश्वास दाखवला आणि अखेर या हंगामात मला खेळता आलं,’ असं स्वप्निल म्हणाला. कर्णधार फाफ दू प्लेसिसने सुरुवातीलाच त्याच्या हातात चेंडू सोपवण्याइतका विश्वास या हंगामात दाखवला आहे. (IPL 2024 Swapnil Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.