गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंतांचा खेळ? Prakash Ambedkar यांच्या प्रश्नामुळे जरांगे पाटलांना भूमिकेवर संशय

“तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करताय, पण त्याच गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना निवडणुकीत पाठिंबा देताय, अ‍ॅड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले,

218
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तुम्ही गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
अ‍ॅड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “आज तुम्ही आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, या सरकारमध्येच एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे असे सगळे प्रस्थापित मराठे आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हेच प्रस्थापित मराठे सत्तेत होते. मग तुम्ही नेमकं कोणासाठी लढताय?”
त्यांनी पुढे टोला लगावला की, “तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करताय, पण त्याच गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना निवडणुकीत पाठिंबा देताय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांच्या मागे उभे राहिलात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा त्यांचीच बाजू घेणार आहात का? गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यातील समीकरणांवर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.