Chandrayaan – 3 : प्रकाश राज यांना चंद्रयान मोहिमेची खिल्ली उडवणे भोवले; पोलिसांत तक्रार दाखल

98

‘चंद्रयान-3’ मोहिमेची खिल्ली उडवणारे ट्विट केल्यामुळे निशाण्यावर आलेले दक्षिणेकडील सिनेसृष्टीतील अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात आता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांनी या अभिनेत्याविरोधात बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चंद्रयान 3 संदर्भात प्रकाश राज यांच्या या पोस्टपासून नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. आता देशातील हिंदू संघटनांच्या नेत्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकाश राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रकाश राज यांची वादग्रस्त पोस्ट

प्रकाश राज यांनी नुकतीच ट्विटरवर एक वादग्रस्त पोस्ट टाकून इस्रोच्या चंद्र मोहिमेतील ‘चांद्रयान 3’ची खिल्ली उडवली होती. प्रकाशराज यांनी चंद्र मोहिमेची खिल्ली उडवणारे कार्टून शेअर केले होते. त्यांच्या पोस्टमध्ये लुंगी घातलेला माणूस एका मगवरून दुसऱ्या मगवर चहा ओतताना दिसत आहे. या छायाचित्रासोबत त्यांनी लिहिले आहे, ‘चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून चंद्राचे पहिले छायाचित्र’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.