PM Narendra Modi : रशिया – युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचा युक्रेनच्या अध्यक्षांना सल्ला; म्हणाले …

दोन्ही देशांमधील सर्व मुद्यांवर लवकरात लवकर आणि शांततामय तोडगा काढण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा राहील, असे मोदींनी अधोरेखित केले. या समस्येवर शांततामय तोडगा काढण्यासाठी, भारताला जे जे करणे शक्य आहे, ते सगळे आम्ही करत राहू.

142
PM Narendra Modi : रशिया - युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचा युक्रेनच्या अध्यक्षांना सल्ला; म्हणाले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (२० मार्च) युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी, विविध क्षेत्रात, भारत-युक्रेन (Russia Ukraine War) भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसेच,रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षावर चर्चा करतांना, पंतप्रधानांनी भारताच्या लोक-केंद्री दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करण्याचा सल्ला दिला.

(हेही वाचा – भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 HP Engine ची घेण्यात आली पहिली चाचणी)

तोडगा काढण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा :

दोन्ही देशांमधील सर्व मुद्यांवर लवकरात लवकर आणि शांततामय तोडगा काढण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा राहील, असे (PM Narendra Modi) मोदींनी अधोरेखित केले. या समस्येवर शांततामय तोडगा काढण्यासाठी, भारताला जे जे करणे शक्य आहे, ते सगळे आम्ही करत राहू, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीसमोर अनेक आव्हाने)

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीकडून भारताची प्रशंसा :

युक्रेनच्या नागरिकांना भारताकडून (PM Narendra Modi) सातत्याने मिळत असलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताची प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांमधे परस्पर संपर्कात राहण्याबद्दल सहमती झाली.

(हेही वाचा – Supreme Court : वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करणे त्रासदायक; न्यायालयाची ईडीच्या कार्यशैलीवर नाराजी)

पंतप्रधान मोदींनी केले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन :

दरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पुतीन यांना फोन करून रशियाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ट्विट करत पंतप्रधान मोदींनी याची माहिती दिली. ते म्हणाले की; “राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोललो आणि रशियन महासंघाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. येत्या काही वर्षांत भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि विस्तारित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली आहे.” (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.