Virat Kohli : कोहलीला या नावाने हाक मारली तर तो बेचैन का होतो?

बंगळुरू संघाबरोबर सराव करताना कोहली काही काळ थोडा अस्वस्थ झाला होता.

169
IPL 2024 Virat Kohli : विराट कोहली ४ हंगामात ६०० च्या वर धावा करणारा दुसरा फलंदाज
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच बंगळुरू फ्रँचाईजीच्या ताफ्यात दाखल झालेल्या विराटने संघाबरोबर फलंदाजीचा मजबूत सराव सुरू केला आहे. मागचे दोन महिने तो घरगुती कारणांमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण, आता आयपीएलमध्ये त्याने मैदानावर पुनरागमन केलं आहे. आणि महिलांप्रमाणेच पुरुषांनाही आयपीएल जिंकता आली तर तो खास क्षण असेल, असं भाष्यही त्याने भारतात आल्या आल्या केलं आहे. असा हा कोहली सरावावर पूर्ण लक्ष केंद्रीत करत आहे. पण, बुधवारी सराव करता करता तो थोडा विचलित झाला. अखेर सीमारेषेवर जाऊन त्याने प्रेक्षकांना आवाहनही केलं.

नेमकं काय झालं होतं? विराट (Virat Kohli) महिला खेळाडूंच्या सत्कारासाठी स्टेजवर आला तेव्हाही असा प्रसंग घडला होता. लोक आनंदातिरेकाने किंग, किंग असं त्याला संबोधत होते. आणि त्यामुळेच विराट (Virat Kohli) काहीसा लाजल्यासारखा झाला. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक दानिश सेतलाही त्याने नम्रपणे किंग म्हणू नकोस, असं सुचवलं.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला अधून मधून विश्रांती घेण्याचा ग्लेन मॅकग्राचा प्रेमळ सल्ला)

आणि नंतर प्रेक्षकांनाही तो म्हणाला, ‘सगळ्यात आधी मला त्या (किंग) नावाने हाक मारणं सोडा. कृपया मला विराट (Virat Kohli) म्हणा. मला खरंच त्या शब्दाने संबोघू नका. अलीकडेच मी फाफ दू प्लेसिसला म्हणालो की, मला बेचैन व्हायला होतं. मला लाज वाटते,’ असं विराट जमलेल्या प्रेक्षकांना म्हणाला.

२००८ पासून विराट कोहली (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचाईजीबरोबर आहे. आणि मधल्या सर्व वर्षांत आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करत त्याने किंग कोहली हे लाडकं बिरूद मिळवलं आहे.

बंगळुरी संघाचा पहिला सामना २२ मार्चला चेन्नईत यजमान चेन्नई सुपरकिंग्जबरोबर होणार आहे. या सामन्याद्वारे विराट डिसेंबर नंतर तीन महिन्यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.