YouTube Disclosure Policy : युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना सावधान, कंपनीची असेल सक्त नजर

एआयने तयार केलेल्या व्हिडिओंसाठी युट्यूबने नवीन नियमावली आणली आहे. 

119
YouTube Disclosure Policy : युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना सावधान, कंपनीची असेल सक्त नजर
  • ऋजुता लुकतुके

युट्यूबची (YouTube) मुख्य कंपनी गुगल आणि मेटानेही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधाराने बनलेल्या व्हिडिओंबद्दल ठोस रणनीती आखण्यात पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गुगल आणि मेटाने अशा व्हिडिओंना लेबलिंग करण्याची यंत्रणा उभी करण्याचं जाहीर केलं होतं. आता युट्यूबही त्यासाठी ठोस पावलं उचलत आहे. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना आता तुम्हाला हा व्हिडिओ एआयचा वापर करून तयार केलेला नाही, असं लिहून द्यावं लागणार आहे. किंवा एआयच्या मदतीने बनवलेला असेल तर युट्यूबला तसं डिस्क्लोजर द्यावं लागेल. (YouTube Disclosure Policy)

एखाद्या व्हिडिओतील जो भाग एआय (AI) वापरून बनवलेला असेल तिथे स्पष्टपणे एआय प्रणालीचं नाव लिहिलेलं असणं बंधनकारक असेल. यामुळे माहितीची पारदर्शकता आणि व्हिडिओ तयार करणारे तसंच तो पाहणारे यांच्यातील पारदर्शकताही सांभाळली जाईल, असं युट्यूबला वाटतं. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती समाज माध्यमांतून पसरू नये यासाठी हा उपाय युट्यूबने आखला आहे. (YouTube Disclosure Policy)

(हेही वाचा – Virat Kohli : बंगळुरूच्या श्रेयांकाची विराट कोहलीबरोबर ‘फॅन – मोमेंट’)

…तर द्यावा लागणार युट्यूबला डिस्क्लेमर 

‘युट्यूबच्या क्रिएटर स्टुडिओत एक नवीन फिचर जोडलं जाणार आहे. यात व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांनी एआयचा (AI) वापर केला असेल तर तसं स्पष्टपणे नोंदवायचं आहे. यातून व्हिडिओबद्दलची पारदर्शकता सांभाळली जाईल.’ असं युट्यूब प्रशासनाने आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. (YouTube Disclosure Policy)

क्रिएटर स्टुडिओत तसं नमूद केल्यानंतर युट्यूबवर तो भाग सुरू असताना altered media/synthetic media असे शब्द लिहून येतील. म्हणजे युट्यूब प्रेक्षकांना हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार झाल्याचं सूचित करेल. या नियमाला काही अपवादही आहेत. व्हिडिओ संकलित करताना ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्टसाठी एआयची मदत घेतलेली असेल तर ते जाहीर करणं बंधनकारक असणार नाही. पण, मुख्य व्हिडिओच एआयर वापरून केलेला असेल तर मात्र युट्यूबला डिस्क्लेमर द्यावा लागेल. फक्त भारतातच नाही तर जगभरात समाज माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडिओंवर सरकारी नियंत्रण वाढलं आहे. आणि अनेक सरकारांनी त्यासाठी देशांतर्गत यंत्रणाही उभी केली आहे. त्यामुळे सरकारांकडून निर्बंध येऊ नयेत यासाठी युट्यूब सारखी माध्यमं प्रयत्नशील आहेत. (YouTube Disclosure Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.