Parbhani Lok Sabha : परभणीत जाधव विरुध्द जानकर यांच्यातच लढत, शिवसेना उबाठाला संपवण्यासाठी अशी लावली जाते ताकद

परभणी लोकसभा मतदार संघात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी आदी विधानसभा मतदार संघ येत असून भाजपाचे दोन आणि रासपाचे एक अशाप्रकारे तीन आमदार आहे.

147
Parbhani Lok Sabha : परभणीत जाधव विरुध्द जानकर यांच्यातच लढत, शिवसेना उबाठाला संपवण्यासाठी अशी लावली जाते ताकद

परभणी लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार संजय जाधव विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यातच सरळ लढत आहे.  शिवसेना पक्ष फुटल्याने शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या समोर जानकर यांचे प्रमुख आव्हान आहे. मात्र, याठिकाणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा राहत असल्याने यंदा ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे ना काँग्रेसचा. त्यामुळे रासपच्या  जानकरांना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ असल्याने उबाठा शिवसेनेच्या जाधव यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Parbhani Lok Sabha)

परभणी लोकसभा मतदार संघात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी आदी विधानसभा मतदार संघ येत असून भाजपाचे दोन आणि रासपाचे एक अशाप्रकारे तीन आमदार आहे. तसेच शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशाप्रकारे प्रत्येकी तीन तीन आमदार या मतदार संघात आहे. विशेष म्हणजे सन १९९९ पासून शिवसेनेचे खासदार निवडून येत असून शिवसेनेचे सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील आणि गणेशराव दुधगावकरहे प्रत्येकी एकदा निवडून आले होते. तर संजय जाधव हे सन २०१४ आणि २०१९ मध्ये संजय जाधव हे युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले. परंतु आता शिवसेना पक्षच फुटल्याने संजय जाधव हे पक्षात कायम राहिलेले आहे. पण त्यांचे निवडणूक चिन्ह बदलल्याने मोठा पेचप्रसंगी निर्माण झाला आहे. या मतदार संघात धनुष्यबाण चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह परिचित असले तरी या मतदार संघात आता शिवसेना उबाठा पक्षाचे मशाल चिन्ह आणि जानकरांचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह आहे. रासपाचे एक आमदार गंगाखेडला निवडून आल्याने जानकरांचे प्राबल्य हे एका मतदार संघापुरते आहे. (Parbhani Lok Sabha)

या मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीचे सर्व नेते झाडून कामाला लागले आहेत. या मतदार संघात उबाठा शिवसेनेला फोडण्यात मुख्य नेता असलेल्या शिवसेनेला यश आलेले नसून परभणीत हातपाय पसरता न आल्याने तसेच फुटही पाडता न आल्याने उबाठा शिवसेनेवरील राग या निवडणुकीच्या माध्यमातून काढायचा आहे. यापूर्वी याठिकाणी घड्याळ चिन्हाचे प्राबल्य असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहे. आज परभणीत उद्योगधंदे नाहीत की पिण्याचे पाणी नाही, रुग्णालय तसेच आरोग्य सेवा सुविधाही नाही. दोन वेळा खासदार बनलेला जाधव यांना आपली छाप काही पाडता आलेली नसून याचाच फायदा प्रचारात जानकर आणि महायुतीचे नेते किती उचलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. या मतदार संघात अनेक उमेदवार उभे असले तरी प्रत्यक्षात निवडणूक ही जाधव विरुध्द जानकर यांच्यात असल्याचे दिसून येते. (Parbhani Lok Sabha)

(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha Constituency : दक्षिण मुंबईतील जागा शिवसेनेला का हवीय? कशी मांडली भाजपापुढे समीकरणे)

सन २०१९ची लोकसभा निवडणूक

संजय जाधव, शिवसेना उबाठा :  ५, ३८, ९४१

राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस : ४, ९६, ७४२

आलमगीर मोहम्मद खान, वंचित :  १, ४९,  ९४६

सन २०१४ची लोकसभा निवडणूक

संजय जाधव, शिवसेना उबाठा : ५,७८,४५५

विजय भांबळे, राष्ट्रवादी पक्ष :  ४, ५१,३००

गुलमीर खान,  बसपा : ३३,७१६

सन २००९ची लोकसभा निवडणूक

गणेशराव दुधगावकर, शिवसेना उबाठा :  ३,८५,३८७

सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस : ३, १९, ०००

राजश्री जामगे, बसपा :  ६४,६११

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.