उमेदवारीवरून Eknath Shinde यांच्या ताठर भूमिकेमागे काय कारण आहे?

शिवसेनेचा उमेदवारीसाठी हट्ट करण्यामागे ‘भाजपाशी स्पर्धा’ नसून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाशी स्पर्धा असल्याचे चिन्ह आहे.

137
उमेदवारीवरून Eknath Shinde यांच्या ताठर भूमिकेमागे काय कारण आहे?
  • सुजित महामुलकर

महायुतीच्या घटक पक्षांमधील अंतर्गत ‘रस्सीखेच’मुळे मुंबईतील दोन जागांसाह एकूण पाच जागांवरील उमेदवार जाहीर होणे अद्याप बाकी आहे. प्रामुख्याने शिवसेना (शिंदे) पक्षाकडून या जागांसाठी आग्रह धरण्यात येत असल्याने भाजपा (BJP) आणि शिवसेनेतील ही कोंडी फुटताना दिसत नाही. अखेर एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांसाठी भाजपासारख्या बलाढ्य पक्षासोबत इतकी ताठर भूमिका का घेतली? (Eknath Shinde)

स्पर्धा उबाठाशी

दुसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाही अद्याप उमेदवार जाहीर न होणे, हे महायुतीच्या उमेदवारांसाठी, पुढे कठीण जाऊ शकते. शिवसेनेचा उमेदवारीसाठी हट्ट करण्यामागे ‘भाजपाशी स्पर्धा’ नसून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाशी स्पर्धा असल्याचे चिन्ह आहे. (Eknath Shinde)

उबाठाने ‘मविआ’तील २१ जागा मिळवल्या

शिवसेना उबाठाने महाविकास आघाडीतील २१ जागा मिळवल्या, त्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने. जितक्या जास्त जागा लढवल्या जातील तितक्या जास्त जागा निवडून येण्याची शक्यता अधिक, असे सूत्र असावे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षापेक्षा उबाठाने अधिक जागा पदरी पडून घेतल्या. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Goa : गोव्यातील ख्रिश्चनांनो, इस्लामिक कट्टरवाद्यांपासून वाचवण्यासाठी मोदींना पाठिंबा द्या; गोव्यात पोस्ट व्हायरल)

शिंदे यांना सिद्ध करावे लागेल

तशाच पद्धतीने शिवसेना (शिंदे) पक्षाकडूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकाधिक जागा खेचून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात आधीच उमेदवारी घोषित केलेल्या वगळून उर्वरित मुंबईतील दोन, दक्षिण मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबई तसेच नाशिक, ठाणे आणि पालघर अशा एकूण १४-१५ जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. उबाठाप्रमाणे शिंदे यांच्यावरही अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा दबाव वाढत चालला असून स्वतःला ‘सिद्ध’ करून दाखवावे लागेल. आणि त्यासाठी उबाठापेक्षा अधिक खासदार लोकसभेत पाठवले लागतील. (Eknath Shinde)

.. पुढे त्याच शिवसेनेचा बोलबाला असेल

यासाठीच दोन्ही शिवसेनेची धडपड सुरु असून ‘ज्या’ शिवसेनेचे खासदार जास्त निवडून येतील, त्या शिवसेनेचा पुढच्या काळात बोलबाला असेल, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होताना दिसते. शिंदे आणि ठाकरे यांची आता खरी परीक्षा उमेदवार निवडून आणण्याची असेल. उबाठा जरी २१ जागा लढवणार असला तरी निवडून येण्याची क्षमता असलेले किती उमेदवार आहेत? तर शिंदे यांचे १४-१५ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी त्यातील लोकसभेत किती जातील, हे येणार काळच ठरवेल. (Eknath Shinde)

सन्मानपूर्वक वागणूकीसाठी

एकीकडे उबाठाशी अस्तित्वाची स्पर्धा असताना शिंदे यांना भाजपासमोर ताठ मानेने युतीत राहायचे असेल तर ‘ओसाड गावाची पाटीलकी’वर सन्मानपूर्वक वागणूक मिळणार नाही, याची कल्पना असावी. यातूनच निवडून येणाऱ्या जागांसाठी ताठर भूमिका घेणे, शिंदे यांना क्रमप्राप्त आहे. (Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.