Nitin Gadkari : नितीन गडकरींचे पंतप्रधानपदाविषयी उघड वक्तव्य; म्हणाले…

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाबाबत वक्तव्य केले आहे. मी आज जो काही आहे, त्याने मी समाधानी आहे, असे ते म्हणाले.

463
Nitin Gadkari : नितीन गडकरींचे पंतप्रधानपदाविषयी उघड वक्तव्य; म्हणाले...
Nitin Gadkari : नितीन गडकरींचे पंतप्रधानपदाविषयी उघड वक्तव्य; म्हणाले...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव पंतप्रधानपदासाठी अनेक वेळा चर्चिले जाते. एक मुलाखतीत उत्तर देतांना नितीन गडकरी यांनी त्याविषयी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नितीन गडकरी म्हणाले की, “मी कधीही पंतप्रधानपदाच्या (Prime Minister) शर्यतीत नव्हतो. मी आज जो काही आहे, त्याने मी समाधानी आहे. मी दृढ विश्वासाने भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी हिशोब तपासत बसणारा नेता नाही.”

(हेही वाचा – Ratna Pathak : ‘मिडल क्लास’ म्हणत लोकांना खळखळून हसवणारी ‘ही’ अभिनेत्री तुम्हाला आठवते का ?)

मी अशा प्रकरणात पडत नाही

सबका साथ आणि सबका विकास या घोषणेवर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार अतिशय चांगले काम करत आहे. मला विश्वास आहे की, मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे मतभेद आहेत, अशा अफवा पसरवल्या जातात. फडणवीस यांच्या राजकीय जीवनातील प्रवेशापूर्वी मी त्यांच्या वडिलांसोबत चर्चा केली होती. जेव्हा एकाच क्षेत्रात दोन मोठे लोक असतील, तर अशा अफवा पसरवल्या जातात. मी अशा प्रकरणात पडत नाही आणि माझी याबाबत कोणती तक्रार देखील नसते. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील माझा सल्ला घेतात, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) या वेळी म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.