Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचा रशियाच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

Vladimir Putin : रविवार, १७ मार्च रोजी लागलेल्या निकालांनुसार ७१ वर्षीय व्लादिमीर पुतिन यांनी ८७.९७ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. १९९९ पासून रशियात पुतिनराजच आहे.

155
Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचा रशियाच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय
Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचा रशियाच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियाच्या (Russia) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सलग पाचव्यांदा पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. रविवार, १७ मार्च रोजी लागलेल्या निकालांनुसार ७१ वर्षीय व्लादिमीर पुतिन यांनी ८७.९७ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. १९९९ पासून रशियात पुतिनराजच आहे.

(हेही वाचा – Kolhapur Accident : भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले; 4 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी)

१९९९ पासून सत्तेत

राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. शुक्रवार, १५ मार्च रोजी रशियामध्ये निवडणूक प्रक्रिया चालू झाली. रशियाच्या अध्यक्षपदासाठी तीन दिवसीय निवडणूक अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडली. या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी सुमारे ८७.९७ टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. व्लादिमीर पुतिन १९९९ पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन (Boris Yeltsin) यांनी १९९९ मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.

टीकेला परवानगी नाही

या विजयाने व्लादिमीर पुतिन यांना ६ वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला आहे. यासह, रशियामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकले आहे. रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केलं. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्यात आला.

रशियामध्ये (Russia) युक्रेन युद्धासाठी व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर सार्वजनिक टीका करण्याची परवानगी नाही. पुतीन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झालेला. त्यांचे इतर टीकाकारही तुरुंगात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.