संघाचे निकटवर्तीय असल्यामुळे नितीन गडकरींना केले ‘टार्गेट’; आरोपीचा चौकशीत गौप्यस्फोट

111
संघाचे निकटवर्तीय असल्यामुळे नितीन गडकरींना केले 'टार्गेट'; आरोपीचा चौकशीत गौप्यस्फोट
संघाचे निकटवर्तीय असल्यामुळे नितीन गडकरींना केले 'टार्गेट'; आरोपीचा चौकशीत गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरची चौकशी सुरू आहे. यामध्ये आरोपी शाकीर याने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रचंड राग असून नितीन गडकरी संघाचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना धमकी दिल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपीच्या चौकशीबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) बंदी टाकली याचा आरोपीच्या मनात संताप होता. जर ‘पीएफआय’वर बंदी येऊ शकते, तर संघावर बंदी का नको..? त्यामुळे नितीन गडकरी हे संघाच्या जवळचे असल्यामुळे गडकरींना धमकी देण्यात आली. ‘पीएफआय’वरील बंदीचा प्रतिशोध घेण्यासाठी गडकरींना टार्गेट करण्यात आले. याप्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर कुख्यात दहशतवाद्यांच्या हातचा बाहुला बनला होता. त्यांनीच २०१४ पासून कर्नाटकातील विविध जेलमध्ये तुरुंगवासात असताना जयेशचे ब्रेन-वॉश केले. जयेशने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. एवढेच नाही तर बेळगावच्या तुरुंगात कैद असताना ही जयेशची अक्षरशः ऐश सुरू होती. त्याला जेलमध्ये असतानाही २४ तास मोबाईल फोन आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध होती. जेलमध्ये असूनही त्याला झोपण्यासाठी बेड मिळत होते. आठवड्यातून दोन तीन वेळेला त्याला बीफची मेजवानी मिळायची. तुरुंगात जयेशच्या या ऐशोरामासाठी काही अदृश्य शक्तींनी एका वर्षात १८ लाख रुपये खर्च केल्याची कबुलीही त्याने तपासात दिली.

(हेही वाचा – संजय राऊतांवर काढणार चित्रपट; माकडाच्या हातात….; शहाजीबापू पाटलांची घोषणा)

जयेश गेले काही वर्ष तुरुंगात असून तुरुंगात असताना तो सातत्याने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. याच लोकांनी जयेशच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे खास समर्थक म्हणून नितीन गडकरी यांच्या विरोधात प्रचंड विष पेरले जेव्हा एक कट्टरवादी आणि देश विघातक संघटना म्हणून पीएफआयवर बंदी लावली गेली आहे, तेव्हा संघावर बंदी का नको असा जयेश पुजारी उर्फ शाकीरचा समज असून नागपूर पोलिसांच्या तपासात त्याने गडकरी यांना धमकी देण्यामागे हेच कारण पुढे केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेंगळुरु तुरुंगात असताना २०१४ मध्ये जयेश पुजारी मोहम्मद अफसर पाशा या ‘पीएफआय’च्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कॉऊन्सिल सचिवाच्या संपर्कात आला होता. त्यानेच जयेश उर्फ शाकीरला गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यास आणि खंडणी मागण्यास सांगितले होते. धक्कादायक बाब म्हणजे हाच मोहम्मद अफसर पाशा पीएफआयचा पदाधिकारी असताना ‘एलटीटीई’च्या ही संपर्कात होता. वर्ष २००३च्या बांगलादेशच्या ढाक्यामधील बॉम्ब ब्लास्ट मध्ये मोहम्मद अफसर पाशाचा सहभाग होता, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

याशिवाय जयेश उर्फ शाकीर २०१४ ते २०१८ दरम्यान टी नसीर उर्फ कॅप्टन आणि फारूख नावाच्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. टी नसीर उर्फ कॅप्टनने जयेश उर्फ शाकीरला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी जयेश उर्फ शाकीर हा धर्मासाठी कट्टरतावादी झाला असल्याचे मागील २ महिन्याच्या तपासात समोर आले आहे. धार्मिक विचारांबाबत कट्टरतावादी भूमिका घेत असून धर्मासाठी जीव देऊ शकतो, अशी मानसिकता त्याची झाल्याची माहिती समोर आली आहे. जयेश उर्फ शाकीर प्रचंड कट्टर असून धर्मासाठी जीव ही देऊ शकतो इतका जहाल बनला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच स्वतःचा सर्वात मोठा शत्रू मानतो आणि त्याला हिजाब, ट्रिपल तलाक आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातल्या राजकीय वादा संदर्भातली सखोल माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.