Nitesh Rane : संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील – नितेश राणे

गौतमी पाटीलला विनंती करेन की तुझं मेकअपच सामान संजय राऊतांना पाठवून दे.

149
Nitesh Rane : संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील - नितेश राणे

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामधील आरोप – प्रत्यारोपाची मालिका अविरत सुरूच आहे. अशातच नितेश राणे यांनी संजय राऊत यांची तुलना सध्या चर्चेत असलेल्या गौतमी पाटील सोबत केली आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde : ‘नावडतीचं मीठही अळणी लागतं’; मुख्यमंत्री शिंदे यांनी केली विरोधकांवर टीका)

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

तर पुढे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, “राऊत यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन की तुझं मेकअपच सामान संजय राऊतांना पाठवून दे. तर ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

हेही पहा –

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेवर बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले कि, ‘आज सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊतांचं फारच प्रेम ऊतू जात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.