Manoj Jarange Patil : फडणवीसांना अडचणीत आणायला शंभर जन्म घ्यावे लागतील; नितेश राणेंचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

130

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सांगू इच्छितो, आपण सगेसोयरे, मराठा आरक्षणावर बोलू, फडणवीस यांना अडचणीत आणायला शंभर जन्म घ्यावे लागतील. मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे की, उद्या आरक्षणाचा विषय न्यायालयात गेला, तर देवेंद्र फडणवीस  हेच कायदेशीर बाजू लावून धरणार आहेत, अशा शब्दांत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

जरांगे पाटील शरद पवारांच्या जवळचे  

राज्य सरकार हे सगेसोयरे या विषयावर आज नाही उद्या निर्णय घेणार आहे. मात्र जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षण आणि सगेसोयरे सोडून राजकीय भाषा वापरात आहेत. जरांगे पाटील यांच्या जवळचे आम्हाला सांगत आहेत की, जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत,  स्थानिक आमदाराच्या जवळचे आहेत. त्यांची भूमिका राजकीय आहे. जर त्यांनी अशी राजकीय भौमिक घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. महायुतीचे सरकार हे मराठा समाज, धनगर, ओबीसी समाजाबरोबर आहे. संजय राऊत यांनी कालरात्रीपासून कुणा कुणाला फोन लावले, जरांगे पाटलांच्या जवळच्या कोणत्या लोकांना कधी फोन केले याचा सीडीआर निघाला तर सगळे उघड होईल. जी भाषा शरद पवार, उद्धव ठाकरे वापरतात, तीच भाषा जरांगे पाटील करतात. स्क्रिप्ट कुठून येते हे कळेले आहे. राजकीय आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत नाही. जे जे लोक आम्हाला फोन करून धमक्या देत आहेत, त्यांच्या घरावर आज किंवा उद्या पोलीस घरी पोहचतील, असे जरांगे पाटील म्हणाले.

(हेही वाचा Manoj Jarange : मराठवाड्यात इंटरनेट सेवा बंद; एसटी सेवाही बंद)

मराठा तरुणांनी उगाच केसेस अंगावर घेऊ नयेत 

सागर बंगल्यावर येण्याचे लांबचा राहिले, त्याआधी आमची भक्कम भिंत उभी आहे. ती ओलांडणे त्यांच्यासाठी सोपे नाही. त्यांच्या बरोबर असलेल्या तरुणांना सांगतो, उगाच अंगावर केसेस घेऊ नका. त्या काढायला कुणी येत नाही. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे तुतारी वाजवू लागले आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाची बदनामी करू नये 

जरांगे पाटील यांचे सहकारी आज जे त्यांच्या विषयी बोलत आहेत, ते खरेच बोलत असतील, तर त्यांचे समर्थक आणि जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करावी. खरे खोटे समोर येऊ दे. उगाच पोलिसांची बदनामी होऊ द्यायची नाही. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हिताच्या बाजूने बोलतील, तर आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहे. पण मराठा समाजाची बदनामी करू नये, असे जरांगे पाटील म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.