Ind vs eng 4th Test : ‘हीरो बनू नकोस,’ असं रोहितने सर्फराझला का सुनावलं?

रोहित शर्माने सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्फराझला असा प्रेमळ आदेश दिला. 

188
Ind vs eng 4th Test : ‘हीरो बनू नकोस,’ असं रोहितने सर्फराझला का सुनावलं?
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा (rohit sharma) खेळाडूंची जी थट्टा मस्करी मैदानात करतो किंवा त्यांच्याशी हास्य विनोद करतो, ते अनेकदा मधल्या यष्टीत बसवलेल्या कॅमेरात टिपले जातात. खासकरून आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतो. असे अनेक प्रसंग आहे जिथे रोहितचं मजेशीर बोलणं ऐकून आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. (Ind vs eng 4th Test)

रांचीतही तिसऱ्या दिवशी एक प्रसंग घडला. पण, यात रोहित (rohit sharma) दुसरी कसोटी खेळणाऱ्या सर्फराझला आपल्या शैलीत ओरडत होता. ‘हीरो बनू नको,’ असं रोहितने म्हटलेलं कॅमेरात ऐकूही आलं. आणि मग सर्फराझ धावत यष्टीरक्षक जुरेलकडे गेला. आणि त्याने हेलमेट आणलं. थोडक्यात, सिली पॉइंटसारख्या फलंदाजाच्या अगदी जवळच्या जागेवर क्षेत्ररक्षण करत असतानाही सर्फराझ हेलमेट घालत नव्हता, म्हणून रोहित त्याला प्रेमाने दटावत होता. (Ind vs eng 4th Test)

(हेही वाचा – Gyanvapi Case: व्यासजींच्या तळघरात पूजा सुरू राहील, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

‘ओए भाई! हीरो नही बननेका,’ असं रोहित (rohit sharma) म्हणतानाची क्लिप सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली. इतकी की, दिल्ली पोलिसांनी ती लगेच उचलली. आणि हेलमेट वापरण्याच्या जनजागृतीसाठी वापरली. दिल्ली पोलिसही आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ए भाई! हीरो नही बननेका. हेलमेट पहननेका!’ (Ind vs eng 4th Test)

खरंतर सर्फराझ तेव्हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. पण, अचानक रोहितने (rohit sharma) त्याला सिली मिड-ऑनवर बोलवलं. सर्फराझ तिथं आला. पण, फलंदाजाच्या जवळ असतानाही त्याने हेलमेट घातलं नाही. परिणामी, रोहितचा असा रोष त्याला पत्करावा लागला. (Ind vs eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.