Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात

116
Navneet Rana:
Navneet Rana: "सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर.." राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मात्र, या टीकेला नवनीत राणा यांच्याकडून जशास तसे उत्तर देण्यात आले. सीतामाईला भोग भोगावे लागले होते. आपण तर राजकारणात आहोत, असे नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटले आहे.

कोण आहे संजय राऊत?

राऊतांना (Sanjay Raut) प्रत्त्युत्तर देताना नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, “कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही. आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्या पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही.” असं त्या म्हणाल्या. (Navneet Rana)

जनाब संजय राऊत…

दरम्यान, संजय राऊत अमरावतीला येऊन गेले. यावेळी त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर (Navneet Rana) टीका केली. याला प्रत्त्युत्तर देताना रवी राणा म्हणाले, “जनाब संजय राऊत, अमरावतीला येऊन नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेवा. ही अमरावती आहे. या अमरावतीत तुमच्यासारखे ५६ गाडण्याची ताकद आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली. १४ दिवस जेलमध्ये ठेवून समाधान झाले नाही. परत तुम्ही अमरावतीला येऊन अशी भाषा बोलता.” असा पलटवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.