अजून किती अभियंते सेवानिवृत्त होण्याची वाट पाहणार महापौर?

अजूनही १३२ अभियंते पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत.

85

मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारात घेतला नाही. परंतु आजवर हा प्रस्ताव मंजूर न झाल्याने, दोन अभियंते सेवानिवृत्त झाले असून, येत्या ३१ ऑगस्ट रोजी आणखी दोन अभियंते निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अजून किती अभियंते निवृत्त होण्याची महापौर वाट पाहत आहेत, असा सवाल आता अभियंता आणि महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

(हेही वाचाः अभियंत्यांना उल्लू बनाविंग)

१३२ अभियंते पदोन्नतीपासून वंचित

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य(शहर) समितीच्या बैठकीत विविध संवर्गातील १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजूर करत, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. परंतु २५ दिवस उलटूनही आणि महापालिकेच्या चार सभा होऊनही अद्याप हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव विचारात घेतलेला नसून, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याकडूनही हा प्रस्ताव संमत करण्यासाठी महापौरांना शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजूनही १३२ अभियंते पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत.

(हेही वाचाः महापालिका अभियंते कोविड योद्धे, तरी पदोन्नतीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी अडवला!)

अभियंते आणि अधिकारी संतप्त

या पदोन्नतीच्या यादीतील दोन अभियंते मागील ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले असून, येत्या ३१ ऑगस्ट रोजी आणखी दोन अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत. महापालिकेच्या दिरंगाईमुळे आधीच दोन अभियंत्यांना पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही. त्यातच आता आणखी दोन अभियंते सेवानिवृत्त होत असल्याने, अजून किती अभियंत्यांना सत्ताधारी पक्ष पदोन्नतीपासून वंचित ठेवणार आहे, असा संतप्त सवाल अभियंते आणि अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

(हेही वाचाः महापालिका अभियंत्यांच्या पदोन्नतीआड उभी ठाकली शिवसेना!)

सहाय्यक आयुक्त शेवटी कार्यकारी अभियंतेच राहिले

यापूर्वी महापालिकेच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जी- उत्तर विभाग आणि त्यानंतर एच-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेल्या अशोक खैरनार यांचे निधन कोविडमुळे झाले. तर बी-विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेले नितीन आर्ते हे सेवानिवृत्त झाले. या दोघांचेही कार्यकारी ते उपप्रमुख अभियंतेपदी पदोन्नतीचा प्रस्ताव वेळेत संमत न झाल्याने त्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पदोन्नतीअभावी ते शेवटपर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून राहिले. याचा परिणाम त्यांच्या सेवानिवृत्तीच्या फायद्यावर झाला आहे.

(हेही वाचाः आम्ही आता कुणाच्याही पाया पडणार नाही! पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अभियंत्यांचा त्रागा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.