बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे; संजय राऊतांनी काय दिले उत्तर?

108

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च सुनावणी गुरुवारी संपली असून न्यायालय आता अंतिम निकाल काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा शिंदेंची शिवसेना पुढे नेत असल्याचे म्हणत आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. तसेच यावेळी त्यांना दोन पर्याय देण्यात आले. एक, राज ठाकरे आणि दुसरा पर्याय एकनाथ शिंदे देण्यात आला होता. यापैकी एकही बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, जे बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेले आहेत, ते त्यांचे वारसदार होऊ शकत नाहीत.

त्यानंतर याच दोन पर्यायांपैकी चांगला नेता राऊतांना सांगण्यास सांगितले. त्यावेळेस राऊत म्हणाले की, नेता बनण्यासाठी जे नेतृत्व गुण असताना ते दोघांमध्ये म्हणजेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाहीत.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या विरोधात लागेल असे समजूनच…संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.