IPL 2023 : ऋषभ पंतला अपघातामुळे विश्रांती; कोण असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार?

189

अपघातामध्ये दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल (IPL2023) हंगामाला मुकणार आहे. हा दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. परंतु आता दिल्ली कॅपिटल्सने महत्त्वाचा निर्णय घेत यंदाचे कर्णधारपद पुन्हा एकदा डेविड वॉर्नरकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. २०२२ मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. यातून तो अद्याप सावरलेला नाही पंतच्या अनुपस्थितीचा फटका दिल्ली संघाला बसणार आहे.

( हेही वाचा : बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे; संजय राऊतांनी काय दिले उत्तर?)

दुसऱ्यांदा कर्णधारपदाची धुरा

२००९ ते २०१३ दरम्यान वॉर्नर दिल्लीचा कर्णधार होता. अखेरच्या काही सामन्यांमध्ये वॉर्नरने दिल्ली संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर वॉर्नरने सनरायजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले. आता ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये डेविड वॉर्नरकडे दिल्ली संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा देण्यात आले आहे. त्यामुळे वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली संघ कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०२२ मध्ये झालेल्या मेगा लिलावामध्ये डेविड वॉर्नरला दिल्लीने ६.३५ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. २०२१ मधील खराब कामगिरीनंतर हैदराबादने त्याला रिलीज केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.