Mangal Prabhat Lodha : उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात बंदी घाला; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे.

27
Mangal Prabhat Lodha : उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात बंदी घाला; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी
Mangal Prabhat Lodha : उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात बंदी घाला; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी

सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही, असे सांगत राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही. कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे.

(हेही वाचा – Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी विनंती करतो की, उदयनिधी स्टॅलिन, जोवर त्याचे विधान मागे घेत नाही, तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी! अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही, असेही लोढा म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.