Bharat Mandapam : G 20 साठी ‘भारत मंडपम’ सज्ज; जाणून घ्या काय आहे तयारी…

मंडपमच्या डिझाइन आणि निर्मितीसाठी वापरले स्वदेशी साहित्य

111
Bharat Mandapam : G 20 साठी 'भारत मंडपम' सज्ज; जाणून घ्या काय आहे तयारी...

जी-20 शिखर परिषदेसाठी (Bharat Mandapam) राजधानी दिल्ली (Delhi) सज्ज झाली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या जी-20 शिखर परिषदेचा उत्साह पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत बैठकीला येणाऱ्या देशांच्या प्रमुख पाहुण्यांचा मुक्काम कोणत्या हॉटेलमध्ये असणार, त्यांच्या स्वागतासाठी काय व्यवस्था आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान, जी 20 परिषदेचा मुख्य कार्यक्रम ‘भारत मंडपम’मध्ये होणार आहे.

राजधानी दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होणारी जी-२० परिषद भारत मंडपममध्ये (Bharat Mandapam) होणार असून या मुख्य कार्यक्रमाला जगातील २६ देशांचे राष्ट्राध्यक्ष हजर राहतील. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना जिवंत व्हावी यादृष्टीने भारत मंडपमची निर्मिती-सजावट केली आहे. येथे शंख, मोरपंख, पंचतत्त्व, योग व सूर्यशक्तीद्वारे देशाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडेल. ‘झीरो ते इस्रो’च्या माध्यमातून सोनेरी इतिहास दिसेल. परिषदेच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कॉरिडॉर उघडला जाईल.

(हेही वाचा – G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर)

परिषदेसाठी असा सजला भारत मंडपम
आधुनिकीकरण : भारत मंडपमच्या (Bharat Mandapam) प्रत्येक हॉलच्या प्रत्येक सीटवर असलेली ऑडिओ व्हिज्युअल सिस्टिम ही १६ भाषा समजू शकते. संपूर्ण इमारत ५ जी क्षमतेच्या वायफायने सुसज्ज आहे. याच परिसरात २८ फूट उंच कांस्याची नटराज मूर्ती (आतापर्यंतची सर्वात मोठी) स्थापित करण्यात येत आहे.
विंडो टू दिल्ली : मंडपमच्या (Bharat Mandapam) चौथ्या मजल्यावर ३ हजार क्षमतेचे ॲम्फिथिएटर आहे. येथे २५ मीटर उंचीवर व्ह्यूइंग गॅलरी असून तिला ‘दिल्लीची खिडकी’ असे नाव दिले आहे. येथून दिल्लीचे दृश्य म्हणजे हिरवळीमध्ये असलेले इंडिया गेटचे शिखर आणि लाल किल्ल्याची तटबंदीही पाहायला मिळते.
कुतुबमिनारपेक्षा अर्धी उंची : या चार मजली (Bharat Mandapam) इमारतीत २४ बैठक खोल्या आहेत. त्यापैकी २० तळमजल्यावर आहेत. एकूण क्षमता १४ हजार लोकांची. ५,५०० वाहनांची पा​र्किंग. उंची ३५ मीटर. म्हणजे कुतुबमिनारपेक्षा (७३ मीटर) सुमारे अर्धी. याच्या सजावटीवर २७ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
सॉफ्ट पाॅवर : योग भिंतीवर ३२ योगासने दाखवली. ती घेरंडा संहितेतून (१७ वे शतक) घेतली आहेत.
संदेश : सांस्कृतिक दालनात २९ देशांच्या २९ भाषांमध्ये वसुधैव कुटुंबकम ‘विश्व एक कुटुंब आहे’ असे लिहिले आहे.
भव्यता : परिषद हॉलची शैली अनन्यसाधारण आहे. शाही लूक देण्यासाठी शंखासारखे झुंबर लावले आहेत.
आत्मनिर्भर भारत : मंडपमच्या डिझाइन (Bharat Mandapam) बनवण्यापासून ते निर्मितीसाठी वापरलेले प्रत्येक साहित्य हे पूर्णपणे स्वदेशी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.