Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर

रुपल ओग्रे असे हत्या करण्यात आलेल्या हवाई सुंदरीचे नाव असून ती मूळची छत्तीसगड येथे राहणारी होती.

149
Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर
Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर

मुंबईतील पवई येथील एका फ्लॅटमध्ये २४ वर्षीय प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या हवाई सुंदरीचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. रुपल ओग्रे असे हत्या करण्यात आलेल्या हवाई सुंदरीचे नाव असून ती मूळची छत्तीसगड येथे राहणारी होती.

एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. अंधेरीतील मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानका जवळील कृष्णलाल मारवाह मार्गावर असलेल्या एनजी कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लॅटमध्ये रुपल राहण्यास होती. सोमवारी सकाळी रुपल हीचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पोलिसांना मिळाला. अज्ञात मारेकऱ्याने रुपलचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुपल ज्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत मिळाली त्या फ्लॅटमध्ये रुपल ही तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासोबत राहत होती. हे दोघेही वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. पवई पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी या घटनेची माहिती दिली आणि आता ते मुंबईकडे निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रुपल रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर शेवटचे बोलली होती, त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांचे ४ विविध पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

(हेही वाचा – Stray Dogs: भटके श्वान चावण्याच्या घटनेत महाराष्ट्र आघाडीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली माहिती)

नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले

पोलिस सूत्राने सांगितले की, मृत हवाई सुंदरीचा काही दिवसांपूर्वी घरातील नोकरासोबत काही मुद्द्यांवरून जोरदार वाद झाला होता आणि तिला धडा शिकविण्यासाठी त्याने हवाई सुंदरीची हत्या केल्याचा आरोप आहे. हल्ल्याच्या वेळी तीने मारेकऱ्याला प्रतिकार केल्याने मारेकऱ्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे, असे सूत्राने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची कसून चौकशी केली जात असून, त्याची भूमिका संशयास्पद आहे हे समजल्यावर त्याला अटक करण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.