Maldives Parliament Clash : मालदीवच्या संसदेत हाणामारी; सत्ताधारी आणि विरोधकांची जुंपली

Maldives Parliament Clash : सत्ताधारी मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मतदान होणार होते, परंतु विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने सत्ताधाऱ्यांनी मतदानच न होण्यासाठी प्रयत्न केले.

442
Maldives Parliament Clash : मालदीवच्या संसदेत हाणामारी; सत्ताधारी आणि विरोधकांची जुंपली
Maldives Parliament Clash : मालदीवच्या संसदेत हाणामारी; सत्ताधारी आणि विरोधकांची जुंपली

मालदीवच्या संसदेत राष्ट्रपती महंमद मोईज्जू (Mohamed Muizzu) यांच्या मंत्रीमंडळासाठी होणाऱ्या मतदानाच्या वेळी गंभीर प्रकार घडला. विरोधकांची संख्या अधिक असल्याने सत्ताधाऱ्यांनी मतदान होऊ नये, यासाठी सभागृहाचे दरवाजे लावून घेतले. यानंतर संसदेत हाणामारी झाली. या घटनेची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्याने मालदीवमधील अराजकाची स्थिती समोर आली आहे. (Maldives Parliament Clash)

(हेही वाचा – Neelam Gorhe : सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधक-सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे)

मालदीवमध्ये चिनी (China) समर्थकांची सत्ता आली आहे. यामुळे मालदीवने (Maldives) भारताविरोधात (India) पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मतदान होणार होते, परंतु विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने सत्ताधाऱ्यांनी मतदानच न होण्यासाठी प्रयत्न केले. विरोधकांसाठी संसदेचे दरवाजे देखील बंद करण्यात आले होते.

काय आहे वाद ?

डिसेंबरमध्ये मालदीवमध्ये मंत्री निवडले जाणार होते. विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी मोईज्जू यांच्या सदस्यांना मंत्री होण्यापासून रोखण्यात आले होते. तेव्हापासून मालदीवमध्ये सत्ताधारी मोईज्जू सरकार मतदान पुढे ढकलत आहे. विरोधी पक्ष एमडीपीने 4 मंत्र्यांची मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांचा विरोधीत असूनही आत घुसलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. परंतु त्याला सत्ताधारी आघाडी पीपीएम आणि पीएनसीच्या खासदारांनी विरोध केला.

(हेही वाचा – Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान; बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क)

राष्ट्रपती आणि खासदारांची निवडणूक वेगवेगळी

मालदीवमध्ये राष्ट्रपती आणि खासदारांची निवडणूक वेगवेगळी असते. गेल्या वर्षी मालदीवच्या राष्ट्रवतीपदासाठी निवडणूक झाली होती, तर खासदारांची निवडणूक ही २०१९ मध्ये झाली होती. मालदीवमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणारा उमेदवार राष्ट्रपती बनतो. त्यामुळे अल्पसंख्य असूनही मोईज्जू राष्ट्रपती झाले. (Maldives Parliament Clash)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.