Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान; बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क

Orange Subsidy : बांगलादेशात अदा केलेल्या आयात शुल्काच्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच किलोमागे ४४ रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार असल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

158
Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान, बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क
Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान, बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क

संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात (Bangladesh) केली जाते; मात्र तेथील सरकारने संत्र्यावर किलोमागे ८८ रुपये आयात शुल्क लावल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. (Orange Subsidy) त्यामुळे बांगलादेशात अदा केलेल्या आयात शुल्काच्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच किलोमागे ४४ रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार असल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

(हेही वाचा – Mumbai Accident : लालबाग उड्डाणपुलावर डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू)

बांगलादेशने वाढवले शुल्क

संबंधित संत्रा उत्पादकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे ३१ मार्चच्या पूर्वी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे, तसे आदेश पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी १८ जानेवारीला दिले आहेत, बांगलादेश हा राज्यातील संत्र्याचा प्रमुख निर्यातदार देश आहे. तथापि, बांगलादेशमध्ये (Bangladesh) भारतामधील संत्र्यावरील आयात शुल्क (Import duty on oranges) किलोमागे ८८ रुपयांनी वाढविल्याने भारतीय संत्र्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली व पर्यायाने संत्र्याची निर्यात कमी झालेली आहे.

राज्यातील संत्रा सर्वाधिक निर्यात व्हावा, यासाठी शासनाने महाराष्ट्रातील संत्र्याकरिता आयात शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान देण्याचा निर्णय ७ डिसेंबरला घेतला होता. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यामध्ये शेतकरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी – सहकारी प्रक्रिया संस्था व निर्यातदार – या घटकांचा समावेश केला आहे व योजना फक्त ३१ मार्चपर्यंतच लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Orange Subsidy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.