Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे खासदार जलील यांना प्रत्युत्तर; तुमचा ‘जिगर का तुकडा’ पाकिस्तानला पळाला

272
Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे खासदार जलील यांना प्रत्युत्तर; तुमचा 'जिगर का तुकडा' पाकिस्तानला पळाला
Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे खासदार जलील यांना प्रत्युत्तर; तुमचा 'जिगर का तुकडा' पाकिस्तानला पळाला

खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर केलेल्या टीकेला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे. सावरकर हे भगोडे असल्याचे अत्यंत हीन वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. (Ambadas Danve)

(हेही वाचा – Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान; बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क)

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी खासदार जलील यांना खडेबोल सुनावले. रझाकार कासीम रझवी (Qasim Razvi) हे पाकमध्ये पळून गेल्याची आठवण या वेळी दानवे यांनी करून दिली आहे.

सावरकर भारतभूमीचे महान सुपुत्र

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या भारतभूमीचे महान सुपुत्र असून आपल्या जिगरचा तुकडा पाकिस्तानला पळून गेल्याचे लक्षात आणून देतो. दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, मिस्टर जलील, भगोडा तर तो आहे रझाकारांचा म्होरक्या कासीम रझवी. ज्याला ‘ऑपरेशन पोलो’ मध्ये सैन्याने पळवून पळवून पिटाळले होते. काही लोकांचा ‘जिगर का तुकडा’ पाकिस्तानला पळाला. सावरकरांनी तर याच देशात आपला देह ठेवला हे ध्यानी असू द्या!, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

कासीम रझवी सारखी लोकांची कत्तल करून पाकिस्तानात (Pakistan) जाऊन आयुष्य घालवण्यात त्यांनी धन्यता नाही मानली. लोकांची कत्तल तर केली नाही ना?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.