Maharashtra : महाराष्ट्र शासनाची सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी ८५ कोटींची तरतूद

72
Maharashtra : महाराष्ट्र शासनाची सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी ८५ कोटींची तरतूद
Maharashtra : महाराष्ट्र शासनाची सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी ८५ कोटींची तरतूद
  • मुंबई प्रतिनिधी

Maharashtra :  सरकारी तिजोरीत खडखडाट असताना राज्य सरकार (State Govt) आपल्या योजनांच्या प्रसिद्धीवर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तब्बल ८५ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या अंतर्गत वृत्तवाहिन्यांमार्फत मराठी , हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबर इतर भाषांमधून रिपोर्ताज, बुलेटिनची निर्मिती करून सरकारच्या निर्णयांची व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. (Maharashtra)

(हेही वाचा – Mehbooba Mufti यांनी तिरंगा उलटा पकडून केला देशद्रोह; भारतविरोधी भूमिका घेतल्याचा त्यांचा इतिहास)

राज्य मंत्रिमंडळ बैठकीसोबतच (Cabinet meeting) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय, योजना तसेच विविध उपक्रमांची नाविन्यपूर्ण पध्दतीने प्रचार प्रसिद्धी करण्याची ही योजना आहे. वृत्तवाहिन्यांसह सर्व भाषेतील वृत्त आधारित डिजिटल माध्यमे यांचाही समावेश माहिती आणि जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम आराखड्यात आहे. आराखड्यानुसार या कार्यक्रमाचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा राहील. त्यासाठी येणाऱ्या ८५ कोटी २२ लाख ३४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या खर्चाला आज मान्यता देण्यात आली. (Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.