पाकिस्तानातून बेकायदेशीर आयातीचा कट उधळला! Kandla Port मधून ३ कोटींच्या खारका जप्त

67
पाकिस्तानी खारकांचा साठा जप्त केलेला
कांडला बंदरात ३६४ मेट्रिक टन खारका जप्त.

भारतात पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन करून तिसऱ्या देशांमार्फत भारतात माल पाठवण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) उधळून लावला आहे. कांडला बंदरात (Kandla Port) केलेल्या विशेष कारवाईत अधिकाऱ्यांनी १३ मालवाहू कंटेनर रोखले. या कंटेनरमध्ये ३६४ मेट्रिक टन पाकिस्तानी खारकांचा साठा आढळून आला असून त्याची बाजारातील किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. हा माल संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) आल्याचा बनावट दावा करण्यात आला होता, मात्र तपासात तो मुळात पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले. (Kandla Port)

(हेही वाचा – LPG Rule Update: घरगुती गॅसधारकांनी १६ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, न केल्यास काय होतील परिणाम? वाचा)

बनावट कागदपत्रे आणि तिसऱ्या देशाचा वापर
तपासादरम्यान असे उघडकीस आले की, हा संपूर्ण साठा प्रथम पाकिस्तानातून दुबईला पाठवण्यात आला होता. तेथे या मालाचे मूळ देश लपवण्यासाठी दुसऱ्या कंटेनरमधून तो भरण्यात आला आणि भारतात पाठवण्यात आला. भारताने पाकिस्तानच्या वस्तूंवर लावलेली संपूर्ण आयात बंदी टाळण्यासाठी आयातदारांनी ही खोटी कागदपत्रे तयार केली होती. यापूर्वी तुतिकोरिन बंदरातही सोमालियाच्या नावाने १.४ कोटी रुपयांची १४ मेट्रिक टन पाकिस्तानी गुग्गुळ राळ (Guggul Resin) आयात करण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. या प्रकरणी दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Delimitation Bill मंजूर करण्यासाठी सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?)

परदेशी व्यापार धोरण आणि कायदेशीर कारवाई
परदेशी व्यापार धोरण २०२३ अंतर्गत सुधारित नियमांनुसार, पाकिस्तानात तयार होणाऱ्या किंवा तिथून पाठवल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आयात पूर्णपणे प्रतिबंधित आहे. कांडला आणि तुतिकोरिन दोन्ही ठिकाणच्या कारवाया सीमाशुल्क कायदा १९६२ च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आढळल्याने संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीचे संघटित जाळे मोडून काढण्यासाठी आणि सीमाशुल्क फसवणूक रोखण्यासाठी तपास यंत्रणांनी आपली पाळत अधिक कडक केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.