Maharashtra Budget Session : लेक लाडकी योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सूट! सारे काही महिलांसाठी…

167

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीस कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरू होती. यानुसार आता उपमुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी विविध निर्णय घेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

( हेही वाचा : Maharashtra budget 2023-2024 : गोवंश आयोग स्थापन होणार )

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची…

‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
– जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
– पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
– अकरावीत 8000 रुपये
– मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

सारे काही महिलांसाठी…महिलांना एसटी प्रवासात, सरसकट 50 टक्के सूट

– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
– कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
– मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
– महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
– गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
– अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
– अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना

– शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
– अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
– या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
– या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.